सचिन चौरसिया प्रतिनिधी
१९९५ मध्ये गावठाणचे प्लॉट पडले होते
रामटेक :रामटेक पासून अवघ्या ३ किलोमिटर वर मानापूर ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या भोजापूर गावात लोकांना घरे बांधण्याकरिता १९९५ मध्ये गावठाणच्या जमिनीचे पलॉट पाडून गरजु लोकांना वाटप केले होते... परंतू योग्य नियोजन न केल्याने ६ लोकांना येण्याजाण्याच्या रस्ताच दिला नाही... लोकांनी घर बांधले परंतू घरात जाण्याकरीता रस्ता नसल्याने रस्त्याच्या न्याय मागण्यासाठी जनप्रतिनिधी, अधिकारी यांचेकडे २५ वर्षापासून हेलपाटे मारीत आहेत... परंतु अजुन पर्यत समाधान झाले नाही....
जागेश्वर यशवंता आष्टणकर वय ५६. रा. भोजापूर यांनी लोकमत पत्रकारला आपली व्यथा सांगीतली... जागेश्वर आष्टणकर यांना गावठाण मधिल प्लॉट मिळाला...परंतू येण्याजाण्यासाठी रस्ताच नाही... कसे तरी गल्लितून किंवा दुसन्याच्या जागेतून जावून घर बांधले... घराचे काम करण्यासाठी भरपूर अडचनी आल्या... जूने घर मोडकळीस आले... केव्हा पडेल यांच्या भरवसा नाही. पण घरी जाण्यासाठी रस्ताच नसल्याने कसे जावे... साधी मोटरसायकल सुद्धा जात नाही...
जागेश्वर आष्टणकर सहित गणेश येडबा चांदेकर, राजेंद्र चंद्रभान पाटील, भगवान शंकर चोपकर, विशवेश्वर नाचनकर, चंद्रमनी श्रीपत गजभिये यांचे याना जाण्यायेण्यास रस्ता नाही...
काय म्हणतात सरपंच संदिप सावरकर
ग्रामपंचायत मानापूर- भोजापूरचे सरपंच संदिप सावरकर यांच्या सोबत बोलले असता ते म्हणाले गावठाण मध्ये ७-८ लोकांना प्लाट वितरीत झाले... त्यांनी घरे तयार केली... परंतु गावठाण नकाशामध्ये रोडची जागा नसल्याने प्लॉटधारकाना जान्यायेण्याकरीता रस्ता नाही... जर अधिकारी यानी जान्यायेण्याकरीता जागा उपलब्ध करून दिली तर ग्रामपंचायत रस्ता तयार करून देईल...
