माणगाव :- (नरेश पाटील)
शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन सोहळा २ ऑगस्ट रोजी आहे.. वर्धापन दिनाच्या औचित्य साधुन दोन दिवसाचा अधिवेशन पंढरपूर येथे आयोजित करण्यात आल्याने माणगाव तालुक्यातील अनेक कार्यकर्ते वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला रवाना होणार असल्याचे प्रतिपादन राजीपचे माजी सभापती तथा माणगाव तालुका शेकाप चिटणीस अस्लम शेख राऊत यांनी सांगीतले...
दरम्यानचा काळात शेतकरी कामगार पक्षाचे १९ वे अधिवेशन सोलापूर जिल्हयातील पंढरपूर येथील विठल रखुमाई पॅलेस येथे भाई डॉ. गणपतराव देशमुख नगरीत हा सोहळा शुक्रवार ०२ व शनिवार ०३ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे... तर या अधिवेशनासाठी रायगड जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते या अधिवेशनात विविध तालुक्यातून शमील होणार आहे.. तर माणगाव तालुक्यातून्ही अनेक कार्यकर्ते या अधिवेशनात सहभागी होणार असल्याचे लक्ष वेधी माहिती माजी राजिप सभापती अन् माणगाव तालुका शेकाप चिटणीस अस्लम भाई राऊत यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अनेक कार्यकर्ते शेकापच्य सोहळा कार्यक्रमाकरीता रवाना होणार आहे... यादरम्यान अधिवेशनमध्ये पक्षश्रेष्ठीकडून मोलाचे मार्गदर्शनही कार्यकर्ते यांना मिळणार म्हणून अंती त्यांनी पुष्टी जोडले आहे...