शहानवाज मुकादम/रोहा
आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन- रोहा पोलीस निरीक्षक मुपडे...
रोहा:(०९ जुलै २०२४) रोहा बस स्थानकातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलास अज्ञात इसमाने पळवुन नेले असुन सदरचा मुलगा आढळून आल्यास रोहा पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन रोहा पोलीसांकडून करण्यात आले आहे... दि:२०/११/२०२३ रोजी ०८.१५ वाजताच्या सुमारास रोहा बस स्थानकातून कु. प्रथमेश मोहन बापलेकर वय वर्ष१७ राहणार निडी पोस्ट वळके ता. मुरुड जि.रायगड यास कोणीतरी अज्ञात इसमाने त्याच्या अज्ञान पणाचा फायदा घेवून पळवुन नेल्याची घटना घडली आहे...
फिर्यादी यांच्या संमतीशिवाय कायदेशीर रखवालीतुन पळवुन नेल्याबाबत रोहा पोलीस ठाण्यात दि:२१/११/२०२३ रोजी १६.२७ वा. गुन्हा रजि. नं. १७७/२०२३ भादवी कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
सदर अपहरण झालेल्या मुलाचा रोहा पोलीसांकडून सर्वतोपरी तपास करण्यात आला असुन सदरचा अल्पवयीन मुलगा अद्याप पर्यंत मिळुन आलेला नाही...
सदर मुलाचा शोध होणे कामी वृत्तपत्रात प्रसिद्धी करण्यात येत असुन अपहृहित मुलाचे वर्णन नाव प्रथमेश मोहन बापलेकर वय १७ वर्ष ११ महिने रा.निडी वळके, ता. मुरुड, उंची-५फुट २इंच,रंग सावळा,अंगाने मजबूत, नेसुस फुल शर्ट, जिन्स पॅन्ट, पायात शाई निळ्या रंगाची बुटे,डाव्य हाताच्या मनगटावर भाजल्याची खुन अशा वर्णनाचा असून सदरचा तपास पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस के.जी.बेल्हेकर करीत आहेत...
संपर्क क्रमांक : ९५९४९०९९६६/८०८७६७१८९८.
सदरचा अपहृहित मुलगा मिळुन आल्यास रोहा पोलीस ठाण्यात किवा वरील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांनी केले आहे...
