मयूर पालवणकर : मुरुड रायगड
मुरुड तालुक्यातील मोजे महाळूंगे खुर्द या गावी देव शयनी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची विधिवत पूजा करून खेळी मेळीच्या,भक्तिमय वातावरणात एकादशी उत्सव साजरा केला...
पहाटे पासून ते सायंकाळी विठ्ठल भक्तांनी विठ्ठल पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाचा लाभ घेतला...
तसेच वारकर्यानी भजन आणि अभंग याच्या साथीने कार्यक्रमाची जणू शोभाच वाढवली होती... या हरिनामाच्या भजनासाठी अजूबाजूच्या गावचे भजन मंडळी सुद्धा हौसेने या कार्यक्रमास उपस्थित होते...
विठ्ठल रखुमाईच्या पूजेचा मान.श्री.सौ . रंजना रमेश रघुनाथ पालवणकर यांना देण्यात आला होता...अशा प्रकारे भक्तिमय वातावरणात महालुंगे गावात पांडुरंगाचा गजर पहाटे पासून रात्री पर्यंत विठ्ठल विठ्ठल अशा अखंड हरिनामाच्या गजरात घुमत होता...
