सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- पोलीस स्टेशन पारशिवनी अंतर्गत पारशिवनी ते आमडी फाटा दरम्यानच्या महामार्गावर नयाकुंड गावाजवळील पेंच नदी पुलावर मोठया प्रमाणात खड्डे पडल्या कारणाने दि. २७ जुलै ला रामटेक विधानसभा युवक काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन करुन रोष व्यक्त करण्यात आला...
या प्रसंगी रामटेक युवक काँग्रेस तर्फे निखील पाटील अध्यक्ष रामटेक विधानसभा युवक काँग्रेस, सचिन सोमकुवर, सौ मंगलाताई निंबोणे सभापती पंचायत समिती पाराशिवनी, सदर ठिकाणी एनएचएआय चे इंजिनीयर श्री ठाकरे साहेब व तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार श्री पागोटे साहेब उपस्थित होते, त्यांनी आंदोलन करते यांना सदर खड्डे वेळोवेळी बुजवून पावसाळा संपताच डांबरीकरण करून देऊ असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले... यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गायकवाड साहेब कन्हान विभाग यांचे मार्गदर्शनाखाली योग्य पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता... यावेळी किशोर निंबोने, प्रज्वल मेश्राम, मयुर साबरे, शुभम वाघमारे आदी पदाधिकारी तसेच गावकरी उपस्थित होते...