सिकंदर आंबोणकर गोरेगाव प्रतिनिधी
दि.२१/०७/२०२४ पत्रकारिते सोबतच सामाजिक बांधिलकीचे मूल्य जपणाऱ्या गोरेगाव-लोणेरे प्रेस असोसिएशन या पत्रकारांच्या संघटनेने आजच्या बदलत्या युगातही शेती ला प्राधान्य देऊन मातीत कसणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा त्यांच्याच शेत शिवारात जाऊन सन्मान करत अनोख्या पध्दतीने दि.२१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली...
रायगड प्रेस क्लब च्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दरवर्षी शेतकऱ्यांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतो यंदा या संघटनेशी सलग्न असलेल्या गोरेगाव- लोणेरे प्रेस असोसिएशन या संघटनेने ग्रामीण भागातील दहिवली गाव येथील श्री. बाळाराम लाखाडे व त्यांना कायम साथ देणार्या त्यांच्या पत्नी सौ.सुरेखा बाळाराम लाखाडे या शेतकरी दांपत्याला सन्मानित केले पतीपत्नीना सोबत सन्मानित करण्याची हि पहिलीच वेळ आहे यासह भिंताड सारख्या खेडेगावातून पदवीधर झालेले श्री वामन बैकर यांनी उच्च शिक्षण, नोकरी नंतर ही शेती सोडली नाही आजही दहा एकरात ते नियमित पिक घेतात त्यांचा देखील प्रगतशील शेतकरी म्हणून सन्मान करण्यात आला. गोरेगाव ग्रामपंचायत चे सरपंच जुबैर अब्बासी ,उपसरपंच दिनेश उचाटे,गोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रेस असोसिएशन चे अध्यक्ष केदार खुळे,कार्याध्यक्ष मुकेश कडू यांच्यासह चंद्रकांत गोरेगावकर, वैभव टेंबे,गिरीश गोरेगावकर,पियुष भोसले आदी पत्रकार व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते...
पत्रकार संघटनेने केलेला गौरव हा आणखी जबाबदारी वाढविणारा आहे यामुळे अधिकची प्रेरणा मिळून आजची युवा पिढी देखील शेती कडे आकर्षित होईल त्यामुळे हा सन्मान अनमोल असल्याची भावनिक प्रतिक्रिया सन्मानार्थी वामन बैकर व बाळाराम लाखाडे यांनी व्यक्त केली...
