महाराष्ट्र वेदभुमी

मूनवली येथील राज्य परिवहन महामंडळाचे अलिबाग आगारातील चालक प्रमोद अनमाने अंतर्गत परीक्षा उत्तीर्ण,


सोगाव - अब्दुल सोगावकर :

मूनवली ग्रामस्थांनी दिल्या शुभेच्छा,

 राज्य परिवहन महामंडळाच्या अंतर्गत परीक्षा नुकत्याच घेण्यात आल्या होत्या, त्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे... यामध्ये अलिबाग आगारातील चालक प्रमोद अनमाने हे गेली अनेक वर्षे चालक पदावर कार्यरत आहेत... त्यांनी आजतागायत विना अपघात सेवा केली आहे, याबाबत त्यांचा राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला होता...

          चालक प्रमोद अनमाने यांना अंतर्गत परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल मूनवली ग्रामस्थांनी गुरुवार दि.१८ जुलै रोजी संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा देत जाहीर सत्कार केला... यावेळी मापगाव ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सानिका घाडी, दिलीप मोंढे,गोविंद अनमाने, सामाजिक कार्यकर्ते सतिश घाडी, सचिन घाडी, संतोष बांद्रे, मनिष खाडे, शैलेश तिर्लोटकर सर, संजय अनमाने, अशोक मोंढे, प्रसाद मसुरकर, सुयोग अनमाने, अभिषेक कदम, रोशन अनमाने, करण खाडे, श्लोक नागावकर, अनिल अनमाने, प्रविण घाडी, महेंद्र कदम, अक्षय नागावकर, निकेश अनमाने तसेच संगिता कदम, रुपाली अनमाने, सुरेखा अनमाने, प्रणिता अनमाने यांच्यासह इतर महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...

फोटो लाईन : मूनवली येथील राज्य परिवहन महामंडळाचे अलिबाग आगारातील चालक प्रमोद अनमाने अंतर्गत परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना ग्रामस्थ,

Post a Comment

Previous Post Next Post