सचिन चौरसिया प्रतिनिधी
समर्थ प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव थाटात साजरा
रामटेक -: शाळा….या दोन अक्षरी शब्दात किती मोठं विश्व सामावलंय, याची जाणीव खरं तर आपल्याला शाळा सोडून काही वर्ष झाल्यावर होते. शाळेचे दिवस खरच खूप भारी असतात. शाळेतलं प्रेम, मित्रांसोबत केलेली मस्ती, मैदानवरचे खेळ, सरांचे बोलणेे, पेपरला केलेली कॉपी, तास चालू असताना केलेली बडबड, सगळ आठवत आता. शाळेचे दिवस परत येत नाहीत. शाळा सोडल्यानंतरही हीच शाळा, शाळेतील शिक्षक आणि शाळेच्या आठवणी या आयुष्यभर अनेकांच्या आठवणीत असतात. १ जुलै शाळेचा पहिला दिवस, कुणी पहिल्यांदाच या नवीन विश्वात आज प्रवेश करेल तर कुणी मोठ्या सु्ट्टीनंतर आज पुन्हा शाळेत जाईल. समर्थ शिक्षण मंडळ,रामटेक व्दारा संचालित समर्थ प्राथमिक शाळा, रामटेक येथे काल दि. १ जूलै ला शाळेच्या पहिल्याच दिवशी ' शाळा प्रवेशोत्सव ' या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे सभागृहात केलेली सजावट व नयनरम्य विद्युत राेषनाई स्वागत व्दार रंगीत फुग्यांची सजावट पाहुण सर्वच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य फुलले. यावेळी त्यांच्या चेहऱ्याची मुद्रा पाहुन त्यांचा आनंद द्विगुणीत झाल्याचे चित्र दिसुन येत होते. अर्थातच शिक्षणाचा आनंद उत्सव प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात व थाटात येथे साजरा करण्यात आला...
शाळा व्यवस्थापनाच्या सुयोग्य व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत
कार्यक्रमात सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती मातेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाला सुरवात झाली. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी सर्व वर्ग व शाळा रांगोळी, फलकलेखन यांनी सजविण्यात आली तसेच शाळेचे सभागृहात केलेली सजावट व नयनरम्य विद्युत राेषनाई स्वागत व्दार रंगीत फुग्यांची सजावट करण्यात आली... यावेळी पुष्पवृष्टी आणि औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले... याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गुंढरे मँडम ,सर्व शिक्षक, आणि व्यवस्थापन समितीचे पालक सदस्य विद्यार्थ्यांच्या स्वागताला उपस्थित होते... 'नेमेची येतो मग पावसाळा' या उक्तीप्रमाणे जुलै महिन्यामध्ये जशी पावसाला सुरुवात होते तशीच नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आणि विद्यार्थ्यांच्या किलबिलिटाने शाळा परिसर व सभागृह गजबजून गेले. उन्हाळी सुट्टी संपवून शाळेत आलेल्या या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता... सुट्टीत आपण काय काय मजा केली हे प्रत्येकाला जणू सांगायचे होते हे जाणवत होतं...काही मुलांनी आपल्या मनोगतात सुट्टीतील मजा आणि शाळेची ओढ कशी होती हे सांगितले. यानंतर शाळेत त्या दिवशी प्रथम प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पाठ्यपुस्तके देण्यात आली... तसेच विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांची ओळख व्हावी, आपल्या वर्गासाठी नक्की कोण वर्गशिक्षक असणार आहे हे समजावे यासाठी सर्व शिक्षकांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला... त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी विद्यार्थ्यांना सरप्राइज विविध गाण्यांवर नाच करत विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले... त्यावेळेचा विद्यार्थ्यांचा आनंद उत्साह समाधान देणारा होता... नाच, गाणी, धमाल करत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आनंदाने साजरा झाला... त्यानंतर आजचा पाेषण आहारात विद्यार्थांना गाेड खिरचे वाटप करुन कार्यक्रमाचे समापन करण्यात आले...
