महाराष्ट्र वेदभुमी

माणगाव नगर पंचायतीचे सभापती दिनेश रातवडकर यांची संपादक दत्तात्रय परळकर यांनी घेतली सदिच्छा भेट



रायगड :- (नरेश पाटील) 

कोकणचे सौंदर्य पाहून काही ठिकाणी स्वतःचे आणि आमच्या प्रतिनिधी बरोबर सेल्फी काढण्याचा झाला परळकरांना मोह 

लातूर येथील प्रसिध्द राज्यस्तरीय साप्ताहिक "समृध्द व्यापार" चे संपादक तथा लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाचे संस्थापक सचिव दत्तात्रयजी परळकर हे कोकण दौऱ्यावर आले असता त्यांनी माणगाव नगर पंचायतचे सभापती दिनेश रातवडकर यांची शनिवारी दि. २९ जून रोजी सदिच्छा भेट घेवून समृद्ध व्यापार प्रकाशित राज्यस्तरीय दिवाळी विशेषांकाची प्रत भेट म्हणून दिली...  


 यावेळी  समृद्ध व्यापार साप्ताहिक कोकण प्रतिनिधी माणगावचे पत्रकार नरेश पाटील, स्थानिक प्रतिष्ठीत नागरिक सचिन गोरेगावकर, इनुस पिलपिले, मज्जित आकुस उपस्थित होते... दरम्यानच्या काळात साप्ताहिक समृध्द व्यापार अंकाचे वित्तिय, शिक्षण, शेती, उद्योग, कर, कायदा, ग्राहक, बँकिंग, रोजगार, गुंतवणूक, व्यवसाय मार्गदर्शन, जिएसटी अशा नाना विषयावर आणि सर्वात महत्त्वाचे असलेल्या विषय " भारत २०४७ (वाटचाल आर्थिक समृद्धीकडे) " प्रकाशन पुस्तक विषयावर दिनेश रातवडकर यांनी सविस्तर चर्चा केली... दरम्यान श्री.परळकर यानी स्वच्छ्ता अभियान, पिण्याची पाणी, सुसज्ज रस्ता या नागरिक सुविधा बद्दलची एकंदरीत आजच्या विषयाबाबत सविस्तर माहिती सभापती दिनेश रातवडकरां कडून जाणून घेतली... तर दुसरीकडे परळकर यांनी फळबाग, भाताचे विविध प्रकारचे विषयाबाबत माहिती दिली... आणि एकंदरीत इतर अनेक विषयावर ही चर्चा करून दिनेश रातवडकर यांनी  या विशेष भेटीबद्दल परळकर यांचे आभार मानले...


 दरम्यान कोकण दौऱ्यावर असलेला परळकर है तामानी घाट, एस्टी स्टँड व माणगाव शहरातील प्रसिध्द काळ नदीची सेल्फी आमच्या जिल्हा प्रतिनिधी बरोबर काढून विशेषकरून या पावसाळाच्या काळात कोकणचे निसर्गसौंदर्याचे दृष्य पाहून अक्षरशः मोहात पडून आठवणीत घेतल्या...

Post a Comment

Previous Post Next Post