सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक : शाळेच्या प्रथम दिवसी ज्ञानदिप कॉन्व्हेन्ट ,जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड ज्ञानदिप कॉलेज ऑफ फार्मसी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, तसेच छोट्या बालकांना मिठाई व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शाळेच्या प्रिंसिपल नी सर्व मुलांना उत्तम मार्गदर्शन करून त्यांना शुभकामना दिल्या व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊन शैक्षणिक सत्र सुरु करण्यात आले. या वेळी शाळेचे अध्यक्ष गजेन्द्रकुमार चौकसे शाळेचे सचिव केवल हटवार , सदस्य सहारे, शाळेच्या सी.ई.ओ. गिता भास्कर मॅडम, शाळेच्या प्रिंसिपल डॉ. भुवनेश्वरी ठाकरे, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना राऊत, डोंगरे तसेच शाळेचे इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ह्या स्वागतुत्सवी कार्यक्रमात प्रमुख्याने उपस्थित होते...
