महाराष्ट्र वेदभुमी

मोहरम सणानिमित्त मेढेखार येथे आ.महेंद्र दळवींसह अनेक मान्यवर, भाविकांची दर्शनाला गर्दी,



सोगाव - अब्दुल सोगावकर :

अलिबाग तालुक्यातील मेढेखार येथे हिंदू मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन घडवणाऱ्या मोहरम सणाला बुधवार दि.१७ जुलै २०२४ रोजी पिर बाबांच्या ताजियाचे दर्शन घेण्यासाठी व हा उत्सव पाहण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व समाजातील महिला व पुरुष ग्रामस्थ, नातेवाईक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, उद्योजक, कला, क्रीडा आदी क्षेत्रातील भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते...

           यावेळी अलिबाग मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी, शेकाप नेत्या व माजी रायगड जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती चित्राताई पाटील, सचिन साळुंखे, शिवसेना(शिंदे गट) रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी, अनंत गोंधळी, पोयनाड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते...मोहरम सणानिमित्ताने दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवरांचा मेढेखार ग्रामस्थांनी जाहीर सत्कार केला...यावेळी सूत्रसंचालन हरिश्चंद्र म्हात्रे व धनंजय पाटील(गुरुजी) यांनी केले तर कार्यक्रमाचे व्यवस्थापन वरची आळी मेढेखार यांनी केले...

Post a Comment

Previous Post Next Post