सोगाव - अब्दुल सोगावकर :
अलिबाग तालुक्यातील एक्स.एन.सी.सी. आणि अलिबागकर एक हात मदतीचा' या व्हाट्सएप ग्रुपतर्फे रविवार दि.१४ जुलै रोजी वायशेत येथील दत्तमंदिर टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले...
वृक्ष हे निसर्गामध्ये महत्वाची भूमिका बजावत असल्याने त्यांना वाचवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे, अन्यथा यापुढील काळात नैसर्गिक जीवन जगणे कठीण होणार आहे... यासाठी प्रत्येक व्यक्तीने दरवर्षी किमान एक तरी निसर्गाला तारणाऱ्या वृक्षांची लागवड करून त्यांना जगविणे आवश्यक आहे, याच उदात्त हेतूने एक्स.एन.सी.सी. आणि अलिबागकर एक हात मदतीचा' या व्हाट्सएप ग्रुपतर्फे ग्रुपमधील सदस्यांनी भरपावसात वेळात वेळ काढून एकत्र येत वृक्षारोपण करत निसर्गाप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे... यावेळी ग्रुपतर्फे दरवर्षी सर्वांनीच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले आहे...
या वृक्षारोपण कार्यक्रमावेळी ग्रुपतर्फे मनोज माळी, सर्पमित्र समीर पालकर, मिलिंद समेळ, अश्विन शिंदे, अमरेश ठाकूर, मनोज समेळ, प्रथमेश पाटील उपस्थित होते...
*फोटो लाईन :* एक्स.एन.सी.सी. आणि अलिबागकर एक हात मदतीचा' व्हाट्सएप ग्रुपतर्फे वृक्षारोपण करताना सदस्य,
