रोहा पुगांव (नंदकुमार कळमकर )
मुंबई-गोवा हायवेवरून कोलाड हायस्कूल कडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असुन या रस्त्यानी जाणारे विद्यार्थी,पालक वर्ग तसेच कामगार, जेष्ठ नागरिक यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे..
या रस्त्यावर प्राथमिक मराठी शाळा, कै.द.ग.तटकरे माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज,तसेच आजूबाजूला असणारी वस्ती असुन याच मार्गानी धाटाव औद्योगिक क्षेत्रात काम करणारे असंख्य गावातील कामगार,विद्यार्थी व रहिवाशी नागरिक या मार्गाने प्रवास करीत असतात परंतु रस्त्याला पडलेले जागोजागी खड्डे नागरिकांच्या जिवावर उठत आहेत...तर जोरदार पाऊस पडला तर या खड्ड्यात पाणी साचते.या साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यात असणारा खड्डा दिसत नाही.. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असुन या रस्त्यानी प्रवास करणे धोक्याचे आहे...
हा रस्ता टाटा पॉवर मालकीचा असुन येथून रेल्वे लाईन सुरु होती.नंतर येथे प्राथमिक शाळा तसेच कोलाड हायस्कूल व जुनिअर कॉलेज झाल्यानंतर हा रस्ता बनविण्यात आला...परंतु कोण रस्त्याचे काम करतो तर कोण हाच रस्ता खोदून पाण्याची पाईप लाईन टाकत आहे तर कोण रस्ता खोदून केबल लाईन टाकत आहे.हे फक्त जणू ठेक्यासाठी चालले आहे...याचा नाहक त्रास या रस्त्यावरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना सहन करावा लागत असुन यामुळे एखादा मोठा अपघात झाला तर याला जबाबदार कोण ? असा अपघात घडण्याच्या अगोदर या रस्त्याचे काम लवकरच लवकर केले जावे अशी प्रतिक्रिया या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे...
