शहानवाज मुकादम/रोहा
गटविकास अधिकारी रोहाकडे कारवाईची मागणी!
दि:०३ जुलै २०२४
रोहा: गट शिक्षणाधिकारी रोहा यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार कारवाई करीत असताना सरकारी कामात अडथळा निर्माण करत राजकीय नेत्यांकडून दबाव होत असल्याचे समोर येत आहे...
गटविकास अधिकारी पंचायत समिती रोहा यांच्याकडून महिला शिक्षणाधिकारी असल्याने गैरफायदा घेत दबाव निर्माण करुन मोबाईलवरून धमक्या दिल्या प्रकरणी कारवाईची मागणी होत आहे...
राजिप उर्दु शाळा खैरेखुर्द येथे उर्दु माध्यमातून इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतचे वर्ग असतानाच गेले दोन वर्षापासून उर्दु शिक्षकाची संख्या मात्र दोनच आहे...विद्यार्थ्यांची संख्या ८४ असल्याने ५ शिक्षक आवश्यक असून मुलांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत आहे...शिक्षण विभागाकडून उर्दु शिक्षक मिळण्यास वारंवार आश्वासनेच मिळत आहेत..
दि: १३ जुन २०२४, रोजी गट शिक्षणाधिकारी रोहा यांनी ज्या शाळेत पटसंख्या १२ असुन दोन शिक्षक उपलब्ध होते, त्यातील एक उप शिक्षकास खैरेखुर्द शाळेत दि:१५ जुन २०२४ रोजी हजर होण्याची ऑर्डर काढण्यात आली आहे...मात्र तेथील मुख्याध्यापक त्या शिक्षकास कार्यमुक्त करण्यास तयार नाही...त्यातच राजकीय नेते मंडळींकडून दबाव निर्माण करत असल्याचेही समोर येत आहे...
गट शिक्षणाधिकारी रोहा यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार कारवाई करत असताना संबंधित नेतेमंडळी कडून सरकारी कामात अडथळा निर्माण करत धमकावण्याचा प्रकार फोनवरून होत असल्याचे खैरेखुर्द शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष,सदस्य,पालकवर्ग व ग्रामस्थ बशीर शेठ धनसे यांच्या समक्ष हा सर्व प्रकार घडला...
शिक्षक न मिळाल्यास पालकवर्गाकडुन मोर्चाचा ईशारा...
सदरच्या राजकीय नेते मंडळींकडून होत असलेल्या दबावात गट शिक्षणाधिकारी महिला असल्याने खैरेखुर्द शाळेला उर्दु शिक्षकाची काढलेल्या ऑर्डरप्रमाणे हजर न केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे...
सदर विषयात गट विकास अधिकारी रोहा यांच्याकडून ऑर्डर प्रमाणे उर्दु शिक्षक मिळण्यास पालकवर्गाकडुन समक्ष भेट घेऊन विनंती करण्यात आली आहे...
सदर विषयी शिक्षण विभागाकडून राजकीय दबाव येत खैरेखुर्द शाळेला काढण्यात आलेल्या ऑर्डर प्रमाणे शिक्षक न मिळाल्यास पालकवर्गाकडुन पंचायत समिती रोहा येथे दि:१० जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य यांनी ईशाराच दिला आहे...
