महाराष्ट्र वेदभुमी

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन वसंत डावखरे 1 लाख 719 मतांनी विजयी



रायगड :- (नरेश पाटील) 

माणगावात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष

विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी दि.०१ जून रोजी नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली... मतमोजणीसाठी एकूण 42 टेबल ठेवण्यात आले होते... या निवडणुकीत एकूण 1 लाख 43 हजार 297  मतदारांनी मतदान केले होते... त्यापैकी 1 लाख 32 हजार 071 मते वैध ठरली... तर 11 हजार  226 मते अवैध ठरली...  जिंकून येण्यासाठी  66 हजार 036  इतक्या मतांचा  कोटा ठेवण्यात आला... 

उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे 

1) निरंजन वसंत डावखरे, भारतीय जनता पार्टी :- 1 लाख 719 

2) कीर रमेश श्रीधर, इंडियन नॅशनल काँग्रेस  :- 28 हजार 585

3) विश्वजित तुळशीराम खंडारे, भीमसेना  :- 536

4) अमोल अनंत पवार, अपक्ष  :- 200

5) अरुण भिकण भोई (प्राचार्य),अपक्ष :- 310

6) अक्षय महेश म्हात्रे, अपक्ष :- 302

7) गोकुळ रामजी पाटील, अपक्ष  :- 424

8) जयपाल परशूराम पाटील, अपक्ष :- 64

 9) नागेश किसनराव निमकर,अपक्ष :- 215

10) प्रकाश वड्डेपेल्ली, अपक्ष :- 33

11) मिलिंद सिताराम पाटील, अपक्ष  :- 208

 12) ॲड. शैलेश अशोक वाघमारे, अपक्ष  :- 334

 13) श्रीकांत सिध्देश्वर कामुर्ती, अपक्ष  :- 141

कोकण शिक्षक परीषद संघटना कार्यवाह लक्षमण बाळू वालगुडेंनी हेट्रिक आ.निरंजन डावखरे यांचे केले अभिनंदन 

पहिल्या पसंतीची  1 लाख 719 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार निरंजन वसंत डावखरे  हे कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी.वेलरासू यांनी जाहीर केले... 

   दरम्यानचा काळात माणगाव येथे भाजपा कार्यकर्ता ता. अध्यक्ष उमेश साटम यांच्या नेत्रतवखली एकत्र येत फटाकडी वाजवून, घोषणा देत पेडे वाटप करून जल्लोष केले... यावेळी जिल्हा युवा अध्यक्ष नीलेश थोरे अवरजून उपस्थित होते...          दरम्यानचा काळात निरंजन डावखरे यांच्या विजयाची बातमी धडकताच त्याचा विजयावर अभिनंदनचे मोठ मोठे बॅनर्स शहरात लावण्यात आले... 

 कोकण शिक्षक परिषद संघटना कार्यवाह लक्षमण वालगुडे सर यानी कोकण पदवीधर मतदार संघाकरीता उमेदवार निरंजन डावखरे यांच्या ना भूतो ना भविष्य असे भारी मत मिळवून देण्याकरीता व हॅट्रिक विजयकरीता भक्कम पाठिंबा देवून  मेहनतीचे चंग बांधून सर्व पदाधिकारी, सदस्य यानी विशेष मेहनत घेतल्याचे पाहायला मिळाले... त्याचबरोबर वार्तालाप करताना सांगितले की विजयी उमेदवार निरंजन डावखरे यांना मतमोजणीचा पहिलाच फेरीमध्येच सुमारे विजयाचे कोठा पूर्ण करून एक लाख 719 मत पहिला पसंदीतीत मिळाले... त्याचवेळी त्यांचे विजय निश्चित झाले.. मात्र त्यांना एकंदरीत किती मत प्राप्त झाले हे निव्वळ औपचारिकता पाहण्यास उर्वरित फेरी घेवून त्यांना प्रत्यक्ष किती मत मिळाले पाहण्यास मत मोजणी झाल्याचे पुष्टी लक्षमण सर यानी अंती सांगीतले.. व निरांजन डावखरे यांच्या विजयावर खास अभिनंदन केले...

Post a Comment

Previous Post Next Post