सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक : श्री सिध्द नारायण टेकडी अंबाळा , रामटेक येथे श्री सदगुरू नारायण स्वामी दरबार मधे गुरुपौर्णिमा उत्सवाचा तीन दिवसीय कार्यक्रम १९ ते २२ जुलै २०२४ पर्यंत उत्साहात सम्पन्न झाला... १९ जुलैला प्रातः दीप प्रज्वलन नंतर अखंड नामजपाची शुरूवात झाली... श्री दत्तगुरु बालयोगी छोटूबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्टा १९ जुलै २४ ला सुश्री साध्वीजी महाराज नारायण टेकडी यांच्या हस्ते संपन्न झाली...
प्रतिदिन सकाळी १० वाजता श्री सद्गुरूनाथजीचा महाअभिषेक झाला... अखंड नामजपाची पूर्णाहुती व महाअभिषेक २२ जुलैला सकाळी १० वाजता संपन्न होउन व महाप्रसाद झाला...श्री दत्तगुरु बालयोगी छोटूबाबा यांच्या मूर्तीच्या दर्शनाचा लाभ भाविकांनी घेतला...
.jpg)