महाराष्ट्र वेदभुमी

एचडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी केले वृक्षारोपण

 


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- रामटेक येथील एचडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी रामटेक येथील समर्थ कनिष्ठ महाविद्यालयात २५ रोपांची लागवड करून वृक्षारोपण केले. वृक्षारोपण मध्ये कडुनिंब, अशोका, गुलमोहर, जामुन, लिंबू या वनस्पतींचा समावेश आहे. शाखा ऑपरेशन  व्यवस्थापक प्रशांत शेवळे, अधिकारी मधे रुषिकेश चिंचोळकर, अतुल पराते, अनिरुद्ध भोगे, वामन धांडे यांच्यासह विपुल मेंघरे, अल्पेश शेंडे, शुभम ठवरे, प्रतीक अंजिवार यांनी वृक्षारोपणात सहभाग घेतला...

 रामटेक येथील समर्थ कनिष्ठ महाविद्यालयात रोपे लावल्याबद्दल संस्थेच्या संचालक मंडळाने एचडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले...

Post a Comment

Previous Post Next Post