महाराष्ट्र वेदभुमी

राजिप प्राथमिक शाळा गोवे येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलनामाची शाळा भरली,


रोहा पुगांव ( नंदकुमार कळमकर )

      रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोवे येथे आषाढी एकादशी निमित्ताने जणू विठ्ठल नामाची शाळा भरली असल्याचे दिसून असुन आले व निमित्ताने विविध वेशभूषात संतांचे दर्शन झाले.अतिशय उत्साही वातावरणात आषाढी एकादशी सोहळा साजरा करण्यात आले.. 

  बुधवार दि १७ जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी जातात परंतु याच आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल दर्शन मुलांच्या रूपात गोवे शाळेत झाले.जणू पंढरीच येथे आवतरली असल्याचे दिसून आले.सर्व वातावरण भक्तिमय झाले होते... महाराष्ट्राची भूमी संतांची असुन याच भूमीत होऊन गेलेले थोर संत जणू अवतरे असल्याचे दिसून आले...

यानिमित्ताने शाळेतील छोट्या मुलांनी विठ्ठल-रुख्मिणी,तसेच संत तुकाराम,संत जनाबाई,संत सखुबाई संत मीराबाई,संत मुक्ताबाई,संत पुंडलिक अशा संताच्या वेशभूषानी जणू वातावरण संतमय झाले होते.यावेळी मधुर आवाजात अभंग सादर केले. सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्यध्यापक जयेश महाडिक सर, शिक्षिका गांधारे मॅडम यांनी मेहनत घेतली तर उपस्थित पालक वर्गानी मुलांचे कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post