महाराष्ट्र वेदभुमी

मर्दनगड परिसर-ब्राह्मण देव मंदिर आवरे येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.


प्रतिनिधी आवरे (शंकर पाटील)  

ही वसुंधरा हिरवीगार व्ह्यावी यासाठी निसर्ग संवर्धना साठी एक पाऊल पुढे सारडे विकास मंच आणि कोमनादेवी ऑक्सिजन पार्कचे निर्माते आणि निसर्गप्रेमी पर्यावरण प्रेमी म्हणून जे सर्वांना परिचित आहेत...असे श्री.नागेंद्र म्हात्रे - सारडे यांच्या येणाऱ्या वाढदिवसाच्या निमिताने आज मर्दनगड परिसर-  व ब्राम्हण देव मंदिर आवरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला...

खरंतर वाढदिवस हा शुक्रवार १२ जुलै रोजी येत आहे पणआपल्या लाडक्या निसर्गसख्याला त्यांच्या वाढदिवसापूर्वीच त्यांना सर्वांत प्रिय असणारी ही अनोखी भेटच जणू या आजच्या कार्यक्रमाद्वारें देऊन एक आदर्श निवास  गावंड सर, आणि शंकर पाटील  श्रावणी सोमवार आरती समूह आदींच्या माध्यमातून समाजापुढे ठेवला आहे...

आवरे शिवमंदिरातील श्रावणी सोमवार आरती- समूह यांच्या सोबतीने नागेंद्र म्हात्रे याचे स्नेही , निसर्गमित्र  निवास गावंड आणि शंकर पाटील यांनी या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केले होत...

या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकातच नागेंद्र म्हात्रे सरांनी निसर्ग आणि झाडांचं महत्व उपस्थित निसर्ग प्रेमींना पटवून दिल... शिवाय "माझ्या वाढदिवसा अगोदरच अशा प्रकारचा कार्यक्रम ठेऊन , निवास गावंड सरांनी एक वेगळी उर्जा देण्याचं काम केलं आहे. " हे नमूद केल. यावेळी  आंबा, काजू, फणस,पिंपळ,अशा झाडांसोबतच चाफा, मोगरा,जास्वंदी ह्या फुल झाडांची  देखील लागवड करण्यात आली. या निमित्ताने मर्दनगडावरील आई एकविरा माता आणि पुरातन शिवमंदिरातील "ब्राह्मण देवाच्या दर्शनाने  मनाला एक वेगळ समाधान लाभल...

या कार्यक्रमाला नागेंद्र म्हात्रे,सुयश क्लासेस आवरे चे निवास गावंड, सदाबहार दोस्ती ग्रुप चे तुकाराम गावंड, संतोष जोशी, पिरकोन चे  विनायक गावंड, शिवकुमार म्हात्रे, मंगेश पाटील , सचिन पाटील दौलत भोईर, शंकर पाटील,कु. सानिका गावंड तसेच वीर वाजेकर A S C कॉलेज फुंडे चे M  SC  ऑर्गनिक- केमिस्ट्रि चे विद्यार्थी सौरभ पाटील, श्वेदांत ठाकूर अप्सर अली अन्सारी , अमित  ठोंबरे,विलास ठाकूर आदी निसर्गमित्रांची उपस्थिती लाभली.अश्या प्रकारच्या उपक्रमात फुंडे महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनि  उपक्रम राबवून सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे या उपक्रमाला विख्यात वास्तुशास्त्र श्री संतोष खंडागळे व जयश्री खंडागळे मॅडम यांनी विशेष सहकार्य केले..

निवास गावंड सर, दौलत भोईर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची  सांगता  झाली...

Post a Comment

Previous Post Next Post