कोलाड (श्याम लोखंडे)
महाराष्ट्र विद्युत महामंडळाचा कारभार आहे तरी कसा तर कोलाड सब स्टेशन मधून कोलाड खांब देवकान्हे परिसरात विजेचा सावळा गोंधळ असल्याने ग्राहकांना सर्व्हिस देण्यास संबधीत खाते तसेच कर्मचारी वर्गातून केली जाते नियमितपणे टाळाटाळ याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल आता ग्रामीण भागातील वीज ग्राहकांकडून व्यक्त केला जात आहे...
कोलाड खांब देवकान्हे परीसरात खांब, नडवली, तळवली, चिल्हे, धानकान्हे, देवकान्हे सह अनेक गावे ही ग्रामीण भागात वसलेली आहेत.. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नेहमीच विजेचा सावळा गोंधळ असल्याने ग्राहकांना होत असलेला वीज पुरवठा खंडित झाल्याने त्यांना रात्री अपरात्री अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून यावर नियंत्रण कोणाचे तर दुसरीकडे विद्युत महामंडळाच्या वतीने नेमण्यात आलेले खाजगी कर्मचारी हे देखील वेळीच ग्राहकांच्या तक्रारींचा निवारण करत नसल्याने तसेच त्यांना वेळीच सेवा देत नसल्याने अधिक मोठी समस्या ग्राहक वर्गाच्या समोर उभी राहत असल्याने त्यांचा घरगुती वीज पुरवठा खंडित झाल्याने सदरच्या ग्राहक वर्गाला सर्व्हिस अथवा सेवा देण्यात कर्मचारी यांच्या कडून टाळटाल होत आहे तर संबधीत नेमणूक केलेले कर्मचारी यांना संपर्क साधला की त्याला कोणत्याही प्रकारे उत्तर नाही जर दिलाच तर तो उलट सुलट दिला जात आहे..त्यामुळे गावागावातून यांच्या गलथान कारभारामुळे अथवा काम चुकारपणामुळे एकच संतापाची भावना व्यक्त केली जात आहे...
वीज बिल वेळेवर भरा अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल असे तगादा लावणारे कर्मचारी विजेच्या बिळात सर्व कर आकारणी घेतात मात्र ग्राहकाला समाधान कारक सेवा, सुविधा देण्यास टाळाटाळ का केली जाते...हा नियंत्रण सवाल उपस्थित होतोय... खाजगी कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे त्यामुळे हे कर्मचारी मनमानी पद्धतीने कामे करत आहेत... त्यामुळे परिसरातील नागरिक कमालीचे संतप्त झालेत..तरी संबधीत खात्याच्या सब डीव्हिजनच्या कनिष्ठ अभियंता अथवा वरीष्ठ अधिकारी वर्गाने याकडे लक्ष केंद्रित करून येथील नागरीकांना वेळोवेळी सेवा देण्यासाठी तसेच त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित करावे... अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जातेय..
प्रतिक्रिया
विद्युत महामंडळाकडून करण्यात येत असलेला वीज पुरवठा वेळोवेळी खंडित होतोय...ऐन पावसाळ्यात मोठया समस्यांना गावातील नागरीकांना सामोरे जावे लागत आहे.. सद्या शेतीची कामे सुरू आहेत त्यामुळे ऐनवेळी वीज पुरवठा खंडित होतो तसेच एक फेज जाणे अथवा ग्राहकाचा विद्युत खांबावरून वीज वहिनी खंडित होणे हे प्रकार घडत आहेत...त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या मोठी आहे तर याची तक्रार संबधीत गाव पातळीवर नेमण्यात आलेल्या कर्मचारी वर्गास कळविण्यात आल्याने ते तक्रार करा असे सांगतात... तर ते आज होणार नाही नंतर करू अशी उलट सुलट उत्तरे ग्राहकास मिळते... हीच खरी विद्युत महामंडळाची सेवा आहे तर ग्राहकांचे तक्रारीचे निवारण करण हे अधिक महत्त्वाचे आहे तरी महाराष्ट्र विद्युत महामंडळ कंपनीने असे काम चुकार कर्मचारी यांच्यावर वेळीच कारवाही करावी अशी मागणी होत आहे - सौ पूजा लोखंडे सामाजिक कार्यकर्त्या खांब विभाग
