माणगाव प्रतिनिधी : (नरेश पाटील)
न.पंचायत,फॉरेस्ट विभाग दखल घेण्याची नितांत गरज.
अतिरीक्त पथे दिवे बसविण्याची मागणी.
पावसाळा काळाचे हंगाम सुरू होताच मगरींचा वावर मानवी वस्तीजवळ असलेल्या तलाव,ओडा नाला तसेच सकल भागत साचून राहिलेले पावसाचे पाणी तसेच काठावर, रस्त्यावर आणि मोकल्या जागेत दिसत असल्याच्या चर्चेला ऊत आले आहे...
याबाबत अधिक माहिती अशी आहे की, सध्या धो धो पाऊस पडत असल्याने या परिस्थितीत मगर मानवी वस्ती जवळ आल्याचे आढळून येत आहे... गेल्या दोन तीन वर्षांपासून या भागात पावसाळा हंगामात स्थानिक रहिवासी यांना मगरीचे दर्शन होत असल्याचा विषय सामान्य बनला आहे... तर यंदाच्या पावसाळ्यातही मगरींचे दर्शन, नदी नाल्यांच्या काठावर, रस्ता ओलांडताना, पाण्यात दबकन उडी मारून जोरदार आवाज होणे, रात्रीचा वेळेत दिसने अशा विविध चर्चेला ऊत आल्याचे दिसत आहे... यात विशेष माहीती म्हणजे गेल्या वर्षी दिसून आलेल्या तीन चार लहान लहान मगरीं आता मोठया होवून वाढ झाल्याची चर्चा नागरिकांमधून बोलताना दिसत असल्याने लोकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे...
दरम्यान मंगळवारी रात्री दहा साडे दहाचा आसपास एका वाहनांचा हेड लाईटच्या प्रकाशात एक मध्यम आकाराचे मगर पाण्याचा ओढ्यातून बाहेर येवून रस्त्याच्या पलीकडे अचानक सरपटत जात असताना दिसले...
ही बाब सदर गाडीतील चालकांनी याबाबत बाळा पवार (डिजे) यांच्या घरच्या मंदळींना सांगीतली की एक मगर तुमचा घराचा बाजू कडील जागेतून गेले आहे... तरी सावध राहावे... ही बाब त्या घरातील ज्येष्ठ महिलांनी आमच्या प्रतिनिधीकडे दूसऱ्या दिवस म्हणजेच १७ जुलै रोजी सकाळी सांगीतले... आपल्या परिसरात मगर असल्याची चर्चा जोरदार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी यानी काही युवकांकडून अधिक माहिती जाणून घेतली...
दरम्यानचा काळात दि. १७ जुलै रोजी सायंकाळी रात्री उशिरा दोन स्थानिक यूवक जात असताना अचानक काही तरी मोठा प्राणी अचानक काळोखात पटकन सरपटून गेल्याची त्यांच्या लक्षात आले असता तात्काळ आपला कडील मोबाईल लाईट तसेच टॉर्च लावुन पाहिले असता त्यांना मगर दिसले आणि त्याच वेळेस आमचे प्रतिनिधी यांना दोन तरुण मोबाईल टॉर्च मधुन काही तरी पाहात असल्याचे निदर्शनास आले... याबाबत विचारपुस केले असता मगर विषयबाबत त्यांनीही माहिती दिली.. त्यामुळे येथिल स्थानिक रहिवासी, पादचारी यानी आपली काळजी घेण्याची नितांत गरज बनली आहे..तसेच या भागात काही ठिकाणी पथे दिवे नसल्याने रस्त्यावरील अंधाराच्या भागात मगर येत असल्याचे दिसून येत आहे ..
तरी नगर पंचायत यांनी तात्काळ या भागास भेट देऊन उपाय योजना हाती घेण्यात यावी .. तसेच सौ. शिंदे,वालेराव साहेब यांच्या निवासाच्या पूर्व दिशेला रस्त्यावर,माजी सरपंच सौ.धुमाळ आणि सार्वजनिक शौचालय येतील भागात पथे दिवे अत्यंत तात्काळाने बसविण्यात यावी...म्हणून जनतेतून मागणी होत आहे.. तसेच फॉरेस्ट विभागानेही येतील तलाव भागात जाळी बसविण्याची मागणी गेल्यावर्षी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी केली होती.. तर वन विभागाने दखल घेवून तात्काळ सदर ठिकाणी येवून उपाय योजना हाती घेण्यात यावी अशीही अपेक्षा आहे...
