प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव चणेरा
अतिवृष्टीमुळे रोहा तालुक्यातील न्हावे येथे एक घर पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तहसील कार्यालयाच्या चणेरा मंडळ सजातील सारसोली तलाठी यांनी सदर नुकसानीची पाहणी करून रितसर पंचनामा करण्यात आला आहे. यावेळी सरपंच नितीन डबीर , उपसरपंच पांडुरंग कासकर , सदस्य निळकंठ कासकर , पाडुरंग न्हावकर , सदस्या संध्या पाटील , ग्रामसेवक वारगे व ग्रामस्थ उपस्थित होते...
राज्यात पुरस्थिती सर्वत्र असून, बहुतांश नाद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यात देखील गेले काही दिवस जोरदार पाऊस बरसतोय जिह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तालुक्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेले काही तास रायगड जिल्ह्यात धो धो पाऊस बारसतोय . रोहा तालुक्यात देखील मुसळधार पाऊस पडत असून पावसाच्या पाण्यामुळे तालुक्यातील न्हावे गावातील ग्रामस्थ प्रवीण मनोहर झुरे व राजेश मनोहर झुरे यांच्या घराची भिंत कोसळून छत पडले आहे. घरातील विजेवर चालण्या उपकरणे , किराणा सामान , सायकल , भांडी , कपाट तसेच घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे... दैव बलवत्तर म्हणून सुदैवानं जिवीत हानी टळली आहे...
नुकसानीमुळे कुटूंबातील नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले असून शासनाने आमच्या नुकसानीची दखल घेऊन योग्य ती मदत देण्यात यावी...अशी भावना झुरे कुटुंबियांनी व्यक्त केली आहे...