सोगाव : अब्दुल सोगावकर
पडलेले झाड बाजूला करण्यात भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख दिलीप भोईर यांचा पुढाकार,
अलिबाग रेवस मार्गावर सोमवार दि.१जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास नांदाईपाडा फाट्यावर भररस्त्यात झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती...
यावेळी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख दिलीप( छोटम शेठ)भोईर यांनी आपल्या मित्रपरिवारांसह घटनास्थळी धाव घेऊन पडलेले झाड जेसीबी व इतर यंत्रणेच्या साहाय्याने बाजूला करत प्रवाशांना व वाहनचालकांना दिलासा दिला. यावेळी मांडवा पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस घटनास्थळी उपस्थित होते...
वाहतूक कोंडी झाल्यानंतर अनेक वाहनचालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारावर नाराजी व्यक्त करत या मार्गावरील धोकादायक असलेली झाडे काढून टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी केली आहे...
