सोगाव - अब्दुल सोगावकर :
दुःखद निधन
अलिबाग तालुक्यातील सारळ येथील अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(अजित पवार गट)नेते अमित नाईक यांचा मोठा मुलगा कु.आद्य अमित नाईक (वय १८) याचे मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयात अल्पशा आजाराने सोमवार दि. १ जुलै रोजी दुपारच्या सुमारास दुःखद निधन झाले. याबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे...
अंत्यसंस्कारावेळी महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेश सचिव प्रविण दादा ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, शिवसेना(उद्धव ठाकरे गट) नेते पिंट्या ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) नेते चारू मगर, किहीम सरपंच पिंट्या गायकवाड, भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख दिलीप भोईर, तालुक्यासह जिल्हाभरातील सर्व पक्षातील प्रमुख राजकीय नेतेमंडळी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, उद्योजक, मित्रपरिवार, नातेवाईक, संपूर्ण मधूशेठ ठाकूर कुटुंबीय, नाईक कुटुंबीय, कुटुंबीय पंचक्रोशीतील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत महिला व पुरुष मंडळी यांनी उपस्थित राहून नाईक कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच कु. आद्य अमित नाईक यांना साश्रुनयनांनी निरोप दिला. त्याच्यावर सारळ येथील स्मशानभूमीत रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले...
त्याच्या पश्चात आई, बाबा, एक भाऊ व इतर मोठा परिवार आहे. अंत्यविधी आज म्हात्रोळी - सारळ येथील स्मशानभूमीत रात्री साडे आठ वाजता होणार आहेत...
