महाराष्ट्र वेदभुमी

खांब विभागात ठिक ठिकाणी वटपौर्णिमा उत्साहात..पावसाची विश्रांती मिळताच सावित्री महिलांनी साधला पूजेचा योग.

 


कोलाड (श्याम लोखंडे ) : 

गुरूवारी 20 जून रोजी पहाटेपासूनच रोह्यात पावसाने धुंव्वाधार सुरूवात केली तर शुक्रवारी 21 जून रोजी वट पौर्णिमा असल्याने भर पावसात देखील महिलांनी बाजारात दाखल होत वट पौर्णिमा असल्याने त्या पूजेसाठी लागणारे साहित्य सामानाची खरेदी केली.मात्र दिवस रात्र पावसाने विश्रांती दिली नाही तर शुक्रवारी देखील पाऊस जोराने होत असल्याने वट पारावर पूजेसाठी जाण्याचा पेच साऱ्या सावित्री महिलांच्या समोर आला मात्र शुक्रवारी दुपारी बारा वाजता नंतर वरून राजाची विश्रांती मिळताच गावातील सावित्री माता महिलांनी तात्काळ वट पारावर जाऊन साधला पूजेचा योग...


रोहा तालुक्यातील कोलाड,खांब,देवकान्हे परीसरात तसेच शहरी भागासह ग्रामीण भागातही ठीक ठिकाणी वटपौर्णिमा महिलांनी उत्साही वातावरणात पार पडला. जांभळ, करवंद, फणसाचे गरे, करंडा फनी, आळू , पानाचा विडा,नारळ,आदि द्रोणामध्ये ठेवून वडाला सात फेऱ्या मारून जन्मोजन्मी हाच पती मिळू दे अशी प्रार्थना करून फळांचे द्रोण एकमेकींना देत हळदी कुंकू वान देत महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली...

वटपौर्णिमा अगोदर दोन दिवस बाजारात यासाठी लागणारे करंडाफणी व विविध प्रकारची जांभळ, करवंद, फणसगरे, आदींचे पानावरील वाटे लहान सहान तसेच आदिवासी महिला विक्रीसाठी घेऊन बसतात व सहज उपलब्ध होते. पण फणस मात्र अधिक किंमतीत विक्रीत होते. पावसाची विश्रांती मिळताच सर्व सावित्री महिलांनी वट वृक्षांचा पारावर जाऊन त्याची भक्ती भावनेने  पूजा करत हा उत्सव भक्ती भावाने साजरा केला..

Post a Comment

Previous Post Next Post