सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी
रामटेक : आजु-बाजुच्या तालुक्यातील लोकांना रामटेक येथील प्रेक्षणीय स्थळ खिंडसी जलाशय बनले... आत्महत्येची केंद्र बिंदु. तीन महिन्यात आत्महत्येची ६ वी घटना... रामटेक येथील तुमसर रोडवरील खिंडसी जलाशयात एका तरुण युवकाचा मृत्यदेह पाण्यावर तरंगतांना पहाटेच्या दरम्यान आढळून आला...
खिंडसी जलाशयात युवक तरंगतांना दिसला असता मृतदेह काठावर आढळला...या घटनेची माहीती सदर रामटेक पोलीसांना दिली असता पोलीस घटनास्थळी पोहचताच युवकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदना करिता उपजिल्हा रुग्नालय, रामटेक येथे पाठविण्यात आले... तरुणांची घटनास्थळी गँल्मर कंपनीची मोटारसायकल बिनानंबरची आढळून आली असता ती खिंडसी जलाशयाचा रस्ताच्या बाजुला उभी करुन युवकाने जलाशयात उडी घेतली असावी...असा पोलीस अंदाज व्यक्त करत आहे... पोलीसांनी तरुणांचा शवाची झडती घेतली असता, त्यांच्या खिशात आधार कार्ड सापडले... कार्डवर संजय बाबुलाल टेंभरे असे नाव असुन वय (४५) वर्ष रा. कांरजा जि. गोंदिया येथील रहवासी आहे ...पोलीसांनी आकस्मित मृत्युची नोंद घेत पूढील कार्यवाही पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. निलेश गांवडे करीत आहे...