मयूर पालवकर -: मुरुड रायगड
अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा आरिफचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय... आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असताना आरिफच्या छातीत अचानक दुखू लागलं होतं... पोलिसांनी त्याला उपचारासाठी जे. जे रुग्णालयात दाखल केले होतं... मात्र, उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे..
गैंगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याचा सहकारी छोटा शकीलला मदत केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता... एनआयएने दाऊद इब्राहिमशी संबंधित टेरर फंडिंग प्रकरणात आरिफला अटक केली होती... आरिफ हा आर्थर रोड तुरुंगात 2022 पासून शिक्षा भोगत होता...
