माणगाव :- (नरेश पाटील)
गुरुवारी दि.२० जून रोजी माणगाव शहर येते माणगाव तालुका काँग्रेस कार्यालयात भारत जोडो अभियान रायगड व माणगाव तालुक्यातील इंडीया आघाडीचे कार्यकर्ता यांचे उपस्थितीत एक सभा दुपारी १२:०० चा सुमारास पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकाल व येत्या कोकण पदवीधर मतदार संघ करीता काँग्रेसचे लोकप्रीय उमेदवार श्री.रमेश कीर आणि विधानसभा निवडणुक बाबत नियोजन आढावा बैठक घेण्यात आली होती...
यावेळी रायगड जिल्हा भारत जोडो अभियानचे संयोजक उल्का ताई महाजन, जिल्हा काँगेस सचिव डॉ. नरेंद्र सिंग, माणगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष विलास सुर्वे, तळा तालुका काँग्रेस अध्यक्ष शरद भोसले ,तळा तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना पक्षाचे अध्यक्ष नितिन साळवी, माणगाव तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष निसार फिरफीरे, माणगाव शहर महीला काँग्रेस अध्यक्ष सौ. महाडिक, महाड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष जनार्दन मानकर,भारत जोडो कार्यकर्ता चंद्रकांत गायकवाड, नथुराम वाघमारे, सौ. देवका मोरे, विजय टेंबे, बशीर करेल,काँग्रेस कार्यकर्ते मुजाफर हूर्जुक, संतोष भोरावकर,आकाश, महादेव शिंदे तसेच काही ईतर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सह अनेक उपस्थित होते...
दरम्यानच्या काळात विलास सुर्वे यांनी उपास्थित सर्वांचे स्वागत तसेच प्रास्ताविक केले... या नंतर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकाला विषयाबाबत सविस्तर माहिती उल्का ताई महाजन यांनी केली... तर डॉ. नरेंद्र सिंग यांनी येत्या कोकण पदवीधर मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रमेश कीर यांना भरघोस मतानी निवडून येण्यासाठी विशेष चर्चा केली तर अंती काही महिन्यांवर येवून ठेपलेल्या राज्याचे विधानसभा निवडणुक विषयावंर विलास सुर्वे यांनी जोरदार मार्गदर्शन केले...
