रिक्षा-टॅक्सीसह इतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची वेळेत पासिंग न केल्यामुळे फिटनेससाठी प्रत्येक दिवशी ५० रुपये दंड आकारण्याचा आदेश नुकताच परिवहन विभागाने दिला आहे...
परिवहन आयुक्तांच्या आदेशा मध्ये, केंद्र शासनाच्या अधिसूचनेद्वारे परिवहन वाहनांची योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास केंद्रीय मोटार वाहन नियम अनुसार ५० रुपये प्रतिदिन शुल्काची तरतूद केली आहे...
महाराष्ट्रातील सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये अशा स्वरूपाचा दंड आकारणी सुरू झाली आहे...त्यामुळे सर्व वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे...