महाराष्ट्र वेदभुमी

रायगड लोकसभा निवडणुकीत सुनिल तटकरे यांच्या विजयानंतर किहीम मध्ये जल्लोष,


सोगाव : अब्दुल सॉगावकर

 ३२ रायगड लोकसभा निवडणुकीत सुनिल तटकरे यांनी प्रचंड मतांनी विजय संपादन केल्याबद्दल अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायत हद्दीत फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून जल्लोष करण्यात आला...

         सुनिल तटकरे यांचे खंदेसमर्थक असलेले किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी किहीम पंचक्रोशीत असलेल्या चोंढी, कामथ, किहीम, बामणसुरे यागावातील मंदिरात जाऊन देवीदेवतांच्या मूर्तीला हार अर्पण करून फटाक्यांची आतषबाजी केली व पेढे वाटून कार्यकर्त्यांसोबत आनंद साजरा केला. तसेच सर्व मतदारांचे मनापासून आभार मानले. यावेळी किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्यासह प्रदीप पाटील, नदीम आत्तार, संतोष किर, निलेश उतेकर, प्रमोद राऊत, सुदेश सावंत, ओंकार आमले, नितीश आमले, दिनेश भोईर, रुपेश लाड, आसिफ मलिक, प्रमेय करमेले, रवींद्र लाड, रोहन कातुर्डे, कृष्णा जेठे, विजय आमले, प्रसन्न कातूर्डे, राजेंद्र चव्हाण, सुबोध काठे, परेश काठे, तसेच इतर पिंट्या गायकवाड मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...

फोटो लाईन : लोकसभा निवडणुकीत सुनिल तटकरे यांच्या विजयानंतर किहीम मध्ये जल्लोष करताना सरपंच पिंट्या गायकवाड व इतर कार्यकर्ते,..

Post a Comment

Previous Post Next Post