शहानवाज मुकादम/रोहा
रोहा तहसील कार्यालयातील शिपाई श्री प्रशांत शेडगे यांच्या महसूल विभागातील प्रदीर्घ सेवेनंतर दि: २८ जूनला निवृत्तीनिमित्त त्यांचा कार्यालयात सन्मान करण्यात आला...
तहसीलदार रोहा श्री किशोर देशमुख, नायब तहसीलदार श्री राजेश थोरे आणी सर्व नायब तहसीलदार, सर्व अवल कारकून, सर्व महसूल सहाय्यक आणी सर्व शिपाई यांच्या उपस्थितीत प्रशांत शेडगे यांच्या सेवानिवृत्तीचा व अनेक तहसीलदारांचा सहवास लाभलेल्या श्री. प्रशांत शेडगे यांच्या नोकरीचा शेवटचा दिवस सर्वांच्या आठवणीत राहावा यासाठी तहसीलदार श्री किशोर देशमुख यांनी शेडगे यांचा मोठ्या उत्साहात सन्मान सोहळा साजरा केला...
प्रशांत शेडगे तहसील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत असताना आजवर अनेक तहसीलदार आणी विविध अधिकारी यांच्या सेवेसाठी ते तत्पर राहिले...
नेहमी तहसीलदारांना हवी असणारी फाइल आणून देणे, सांगितलेली सर्व कामे पार पाडणे, गोरगरीब जनतेला ही नेहमीच मदत होईल आशी कामे त्यांनी केली म्हणूनच प्रशांत शेडगे यांची कमी तहसील कार्यालयात नेहमीच जाणवेल...