प्रवाश्यांची गैरसोय तसेच एस टी स्टॅन्डची दुरअवस्था याबाबत निवेदन
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील महामार्गावरुन जाणाऱ्या काही एसटी बसेस पेण शहर व वडखळ नाका येथून न जाता त्या ओव्हर ब्रिजच्या वरून जातात त्याचा परिणाम वडखळ बाजारपेठेवर होत आहे.तसेच सर्वसामान्य प्रवाशी वर्गाला रामवाडी येथे उतरून दुसऱ्या गाडीने प्रवास करावा लागत आहे.यामुळे प्रवाशी वर्गाला आर्थिक भुर्दंड व त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे एसटी बसेस या ओव्हर ब्रिजच्या खालून नेण्यात यावे अशी मागणी विश्वास मधुकर बागुल वरसगांव (कोलाड)येथील शिवसेना शाखा प्रमुख यांनी विभागीय नियंत्रण अधिकारी पेण यांना दिलेल्या लेखी निवेदन केली आहे..
तसेच पेण, वडखळ, नागोठणे,पाली,तसेच असंख्य एसटी स्टॅन्डमध्ये पावसाळ्यात अतिशय बिकट अवस्था आहे.येथे विद्यार्थी, तरुण वर्ग,जेष्ठ नागरिक, महिला वर्ग, या प्रवाशी वर्गाला चिखल व पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे तरी शासनाने याकडे लक्ष देऊन स्टॅन्डची डागडुजी करावी अशी मागणी विभागीय नियंत्रण अधिकारी पेण यांना दिलेल्या निवेदनात केली आहे..
