सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक : परमपूज्य परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम येथे शनिवार ला दुपारी नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे व माजी मंत्री सुनील केदार यांनी सदिच्छा भेट दिली... यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजुजी मदनकर यांनी सत्कार करून आभार व्यक्त केले.... मी महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा २० वर्षांपासून सेवक आहे... मला प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सेवकांनी अनगीणत मदत केली... प्रचारदरम्यान अनेक सेवकांनी व महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने प्रचार केला... मी सेवकांच्या समस्या मार्गी लावीन. मौदा "ब" प्राप्त मौदा आश्रमला खासदार निधी कमी पडू देणार नाही... निवडून येण्यात माजी मंत्री सुनील केदार यांचा सिंहाचा वाटा आहे....सुनील केदार व सेवकांच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने मला लोकसभेत यश आले...असे प्रतिपादन खासदार श्यामकुमार बर्वे यांनी केले...
मंडळाचे अध्यक्ष राजुजी मदनकर यांनी खा. श्यामकुमार बर्वे यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस यशस्वी शुभेच्छा दिल्या...
यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजुजी मदनकर, कोषध्यक्ष प्रवीण उराडे, सहसचिव मोरेश्वर गभने, आश्रमचे सहव्यवस्थापक पांडुरंग शेंडे, माजी मंत्री सुनील केदार, सुनील रावत, माजी जि प अध्यक्ष रश्मी बर्वे, विक्की साठवणे, शुभम तिघरे, प्रकाश हटवार, प्रकाश कावळे नेताजी कांबळे व अनेक सेवक सेविका उपस्थित होते...
मौदा आश्रम येथे सेवकांची गर्दी
परमपूज्य परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम येथे दररोज हजारो सेवक प्रार्थना स्थळी येत असतात...दर शनिवार व रविवारला सुमारे सहा हजार सेवकांची उपस्थिती असते...याकरिता मंडळ उपाययोजना करीत आहे...आश्रमात जाण्याकरिता महामार्गापासून आश्रम पर्यंत आमदार निधीतून दुपदरी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे...स्वयंपाक घर व इतर कामे सुरु आहेत...भविष्यात आश्रम येथे अनेक सुविधा करायच्या आहेत...असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष राजुजी मदनकर यांनी केले...