पुगाव - खांब (नंदकुमार कळमकर )
रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यात शैक्षिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचालित रा. ग. पोटफोडे हायस्कूल चा यंदाचा इयत्ता दहावीचा निकाल ९२.८५ टक्के लागला असून या विद्यालयातील एकूण ५६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील ५२ विद्यार्थी उत्तमरीत्या पास होत शाळेची यशस्वी परंपरा निकाल देत संस्थेचा तसेच शाळेचा नाव उज्वल केले आहे...
सन २०२३-२०२४ घेण्यात आलेल्या यंदाच्या एस. एस. सी. बोर्डाचा निकाल सोमवारी दि २७ मे २०२४ रोजी दु.१ वा.सायबर कॅफे अथवा इंटरनेट मोबाईलवर माध्यमातून जाहीर झाला असून या परीक्षेत रा. ग. पोटफोडे विद्यालयाची यशस्वी परंपरा राखत शाळेचा सेमी इंग्लिश चा यशस्वी निकाल ९२.८५ टक्के जाहीर झाला असून कु.श्रियोग चंद्रकांत देशमुख यांनी ९१.४०% गुण मिळवून प्रथम, कु. सिद्धी तुकाराम धामणसे ९०.८० % गुण मिळवून द्वितीय, आयुष अशोक शेळके ८९ .६० % गुण मिळवून तृतीय, आर्या रमेश पिंपळकर ८८.४०% गुण मिळवून चतुर्थ क्रमांक, तसेच अनिकेत सुनील कलमकर ८६.४० % गुण मिळवून पाचवा क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत...
तर यंदाच्या इयत्ता दहावीच्या सेमी इंग्लिश मधे उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब चे विश्वस्त रा. ग. पोटफोडे मास्तर तसेच विद्यमान अध्यक्ष महेंद्रशेठ पोटफोडे,भाई पोटफोडे,संचालक शंकरराव म्हसकर, सचिव धोंडू कचरे,रामचंद्र चितळकर, वसंत मरवडे,धनाजी लोखंडे,राम मरवडे,मारुती खांडेकर, बाबुराव बामणे, गजानन भोईर, विजय पवार,सागर मोरे,संजय भिसे,बाळाराम धामणसे, हरिश्चंद्र धामणसे,प्रकाश थिटे, सुभाष माठल प्राचार्य सुरेश जंगम,तसेच सर्व शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी वर्ग संस्थेचे संचालक,सदस्य ,तसेच विभागातील ग्रामस्थ नागरिक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या...