महाराष्ट्र वेदभुमी

सुरज शेख याचे बारावी सीबीएससीत यश.

 


उरण दि १५(विठ्ठल ममताबादे )

सुरज नूरा शेख मु.जासई.याने सीबीएससी बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. तो टी.एस.रहमान, न्हावे.या विद्यालयात शिकत होता, कोणताही क्लास न लावता त्याने ८० % गुण प्राप्त केले आहेत.सुरज चे पालक नूरा हसन शेख हे रयत शिक्षण संस्थेत शिक्षक असून ते रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक आणि दी रयत सेवक को ऑपरेटिव्ह बँक, सातारा चे मा.व्हॉईस चेअरमन आहेत,सुरजने या यशाचे श्रेय आपले आई वडील आणि शिक्षकांना दिले आहे. त्यास पुढे कॉम्पुटर सायन्स या फिल्ड मध्ये उच्च शिक्षण घ्यायाचे आहे...

त्याच्या या यशाचे अभिनंदन श्री.छ.शिवाजी हायस्कूलचे प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर मा.अरुण घाग, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष  सुरेश पाटील, रयत सेवक को ऑपरेटिव बँक साताराचे स्वीकृत संचालक आणि गुरुकुल प्रमुख संतोष ठाकरे यांनी केले असून त्याचे ग्रामस्थ,नातेवाईक व सर्व स्तरातून कौतुक होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post