पुगाव - रोहा (नंदकुमार कळमकर)
कोलाड पाटबंधारे विभागाकडून कुंडलिका सिंचनातून बारमाही वाहत असलेला उजवातीर समजणाऱ्या कालव्यातुन आर. सी. एफ कंपनीला मोठया प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे या प्रचंड सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कालव्याला मोठया प्रमाणात गुरूळ पडल्यामुळे पाणी गळतीचा पाझर होऊन हे सांड पाणी राऊत बाग पुई येथे राहणाऱ्या विनायक सोसायटीच्या बंगल्याच्या चारही बाजूला मोठया प्रमाणात जात असल्यामुळे या पाण्याचा नागरिकांना नाहक त्रास होत असुन याविषयी कोलाड पाटबंधारे खात्याच्या कार्यालयात वारंवार तक्रार करण्यात आली परंतु पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष होत आहे तर या पाण्याच्या गलकीमुळे होत असलेला नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल करत येथील ग्रामस्थ नागरीक आता सदरच्या खात्यावर कमालीचे आक्रमक झाले आहेत..
डोळवहाल बंधारा तसेच कुंडलीकेच्या सिंचानातून कोलाड पाटबंधारे तसेच जलसिंचन विभगा मार्फत अनेक वर्षांपासून आरसीएफ कंपनीला पाणी पुरवठा केला जात आहे.परंतु कुंडलिका नदीच्या उजवा तिरावरील पाटबंधारे खात्याच्या याच कालव्याची डागडुजी अथवा दुरूस्ती अनेक वर्षांपासून केली गेली नाहीत यामुळे ठिकठिकाणी कालव्याला गेलेले गुरूळ अथवा त्याला लागलेली गलकीमुळे व या सांडपाण्याच्या गळतीमुळे अनेक शेतकरी वर्गाचे तसेच काही घर कुटुंबीयांचे मोठे नुकसान होत आहे...
गेली दहा ते बारा वर्षांपूर्वी या कळव्याच्या पाण्यावर रोहा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतजमीन भिजत होती यात भाताचे पीक मोठया प्रमाणावर घेतले जात होते याशिवाय लोकांना पिण्यासाठी पाणी ही मुबलक प्रमाणात मिळत होते. विहिरी ही तळ गाठत नव्हत्या गुरेढोरे यांच्या चारा व पाणी याचा ही प्रश्न सुटत होता आता परिस्थिती उलट झाली आहे. शेतकऱ्यांसाठी शेतीला पाणी नाही परंतु धनदांडग्यांसाठी पाणी मुबलक हे व्यवसायिक धोरण पाटबंधारेखात्यानेस्वीकारले आहे.त्यात कालव्यात कित्येक गुरुळ आणि त्याला लागलेली गळती या सांडपाण्यामुळे लगतचे शेतकरी आणि ग्रामस्थ नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे तर या बाबत अनेक निवेदन दिली तक्रारी केल्या मात्र यावर या खात्याचे अधिकारी कोणतीही ठोस उपाय योजना करण्यास तयार नाहीत ते निष्क्रिय ठरत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या गळक्या पाण्याचा नाहक त्रासामुळे घरात चिखलातून प्रवास करावं लागत असल्याने येथील शेतकरी आणि ग्रामस्थ नागरीक आधीक आक्रमक्तेच्या पवित्र्यात आहेत...
प्रतिक्रिया
कुंडलिका सिंचनातून वाहणारा उजवा तीर कालवा अतिप्रमाणात पाणी गळतीमुळे राऊत बाग येथे राहणाऱ्या विनायक सोसायटीच्या बंगल्याच्या आजूबाजूला पाणीच पाणी होत आहे या बाबत कोलाड पाटबंधारे खात्याकडे वारंवार तक्रार करून पाटबंधारे खाते तसेच संबधीत अधिकारी वर्ग दुर्लक्ष करीत आहे परंतु यांच्या गलथान कारभरामुळे विनायक सोसायटीच्या राहणाऱ्या नागरीकांना अक्षरशः या चिखल मातीतून ये जा करावे लागत आहे तसेच या बंगल्याचे देखिल मोठे नुकसान होत असल्याने याला फक्त कोलाड पाटबंधारे खाते जबाबदार राहील असे येथील रहवाशी गीता गौतम जाधव (वंचित बहुजन आघाडीच्या रोहा तालुका महिला अध्यक्षा ) यांनी सांगितले आहे.


