अलिबाग (सचिन पाटील)
शब्दरजनी साहित्य समूह, पुणे तर्फे वसंत ऋतूचा साहित्यिक सोहळा साजरा करण्याच्या निमित्ताने पाचव्या महास्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वसंत ऋतू म्हणजे काळोखी दुःखानंतर मिळालेला प्रकाशरूपी सुख, खचलेल्या मनाला मिळालेली नवीन आशा, अशा या उत्साहपूर्ण वातावरणात ही महास्पर्धा नुकतीच पार पडली. दिनांक २२ ते २७ मार्च या कालावधीत विविध साहित्य प्रकारांवर आधारित एकूण सहा स्पर्धांचे अनुक्रमे काव्यलेखन, मुक्तछंद काव्यलेखन, अति लघु कथा लेखन, अभंगलेखन, हिंदी काव्यलेखन, ललित लेखन अशाप्रकारच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना फक्त महाराष्ट्रच नव्हे तसेच परदेशातूनही मान्यवर सारस्वतांनी सहभाग नोंदवून महास्पर्धेला उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या महास्पर्धेसाठी परीक्षक म्हणून साहित्य क्षेत्रातल्या (नीलिमा पाठक, मुक्तछंद काव्य- डॉ श्यामल पाटील अग्रवाल, अलक लेखन- मयूर पालकर, अभंग लेखन- शबाना मुल्ला, हिंदी काव्य- विराज पाटील, ललित लेखन- निरेन आपटे आणि अलका माईनकर) अशा प्रतिभावंत कवयित्री- लेखिकांची निवड करण्यात आली होती...
शब्दरजनी साहित्य समूह संस्थापिका कवयित्री / लेखिका सौ अनिता आबनावे, समूह संयोजिका, समूह सहायक कवयित्री/लेखिका सौ राजश्री भावार्थी आणि कवी /लेखक मयूर पालकर यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांतून या महास्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता ही स्पर्धा अतिशय उत्साहपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात संपन्न झाली.
