उरण ( सुनिल ठाकूर ).
सिडकोच्या उलवे नोड मध्ये कोस्टल रोड च्या कामासाठी अवैध खारफुटी ची कत्तल राजरोसपणे सध्या सूरू आहे. हि कत्तल करून त्या वर डेब्रिज चा भराव केला जात आहे... ही बाब अतिशय गंभीर आहे.या बाबत जागरूक उलवे शहर वाशीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गटाचे संतोष काटे हे आक्रमक झाले आहेत...
त्यांनी तातडीने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या जटील प्रश्नावर लक्ष वेधले आहे. श्री संतोष काटे, हे अजित दादा पवार यांचे खास जवळचे सहकारी समजले जातात. त्याने याबाबत मंत्री अदिती ताई तटकरे, यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली आहे. हे तातडीने थांबवण्यात यावे. याची संपूर्ण चौकशी व्हावी. म्हणून काटे आग्रही आहेत...
शासकीय नियमांचं उल्लंघन करून जे ठेकेदार हे काम करतात त्यांना तातडीने ब्लॅक लिस्ट करावे अशी मागणी संतोष काटे यांनी केली आहे. याकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबना सारखी कठोर कारवाई करावी अशी हि मागणी त्यांनी केली आहे...
