महाराष्ट्र वेदभुमी

रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे मोठ्या फरकाने निवडून येतील : मधुकर पाटील



कोलाड (श्याम लोखंडे) 

३२ रायगड रत्नागिरी लोकसभेची निवडणूक मतदान प्रक्रीया  मंगळवर दि ७ मे रोजी पार पडली. या लोकसभा निवडणूकीत भाजप , शिवशेना शिंदे गट, मनसे,राष्ट्रवादी पक्ष सह मित्र पक्ष  महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार, कोकण विकासाचे शिलेदार कर्तव्यदक्ष कार्यतत्पर सुनिल तटकरे हे या झालेल्या निवडणुकीत मोठ्या फरकाने निवडून येतील असा ठाम विश्वास रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी व्यक्त केला आहे...

मधुकर पाटील यांनी सांगितले की, रायगड लोकसभा मतदारसंघात खा. सुनिल तटकरे साहेबांनी केलेली विकासकामे, अनेक लोकहिताच्या राबवलेल्या योजना, मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी योजना यामुळे आणि पुढील विकासकामे खा. तटकरेच करु शकतील असा नागरिकांना विश्वास असल्याने त्यांचा खा. तटकरे यांना पुर्ण पाठिंबा आहे. तसे या निवडणूक प्रचारार्थ रोहा शहरासह तालुक्यातील धाटाव, वरसे,आंबेवाडी, खांब, कोलाड,  नागोठणे, चणेरा, खारगाव, कुंभोशी, आरे, मुरुड, अलिबाग, पेण, इंदापूर, माणगाव, महाड, श्रीवर्धन यांसह रायगड आणि रत्नागिरी अशा सहा विधान सभा मतदासंघांपैकी संपुर्ण मतदारसंघातील त्या त्या विभागात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट,आरपीआय, मनसे व सर्व महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खुप मेहनत घेतली आहे व त्याला जनतेनेही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. रायगड जिल्ह्याचा वातावरण पाहता खा. सुनिल तटकरे खुप मोठ्या फरकाने त्यांच्या समोरील प्रतिस्पर्धी उमेदवार अनंत गीते यांचा पराभव करून निवडून येतील अशी खात्री जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी व्यक्त केली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post