महाराष्ट्र वेदभुमी

रोहा कुंडलिका नदीपात्रात मगरीचे पिल्लु आढळल्याने एकच खळबळ,नागरिकांच्या सतर्कतेमुले केले जेरबंद.


कोलाड (श्याम लोखंडे) 

रोहा तालुक्यातील तसेच डोळवहाल सिंचनातून बारमाही वाहणारी किंडलिका नदीपात्रात वरसे हद्दीत सोमवारी १३ में रोजी सायंकाळच्या सुमारास कुंडलिका नदीत मगरीचे पिल्लु आढळल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली तर पहिल्यांदाच या नदीपात्रात वास्तव्यास असलेल्या मगरीचे पिल्लु आढळल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले आहे...


कोलाड पासून रोहा कडे वाहणारी बारमाही कुंडलीका नदी रोहा शहराजवळ असणाऱ्या वरसे येथे कुंडलीका नदीत मगर असल्याची वार्ता हा हा पसरली आणि याची माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव सामजिक संस्थेच्या पथकाच्या कानावर ही वार्ता समजताच क्षणाचा ही विलंब न लावता नदीकडे धाव घेत हे मगरीचे पिल्लु जेरबंद करण्यात यशस्वी ठरले आणि शेकडो नागरिकांनी सुटकेचा श्र्वास सोडला मात्र नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे ...


रोहा शहराच्या तसेच बारमाही वाहणारी कुंडलिका नदी मध्ये मगरीचा वावर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून नदीत मगर असल्याची चर्चा सुरू होती. याच नदीपात्रात नागरिकांनी मगर पाहिली होती.मात्र तिचा शोध लागला नाही तर पुन्हा एकदा ही बाब समोर आली आणि सोह्यातील या संस्थेने रोहा मधील नदीत मगर पकडुन जेरबंद केली तर जेरबंद करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे...

कोलाड डोलवहाल बंधाऱ्यातून वाहत असलेली कुंदलिका नदी या नदी तीरावरील गाव वस्तीतील नागरीक पाणी, महीला वर्ग कपडे धुणे यासाठी येत असतात, तसेच गुरांना पाण्यावर ने आण करतात त्याच बरोबर सद्या शाळेतील लहान मुलांना उन्हाळी सुट्टी असल्याने बच्चे कंपनी पात्रात पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी जात असतात माञ या नदीपात्रात पहिल्यांदाच मगरीचे वास्तव आढलून आल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले असुन त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आले असल्याचे बोलले जात आहे.परंतू या मगरी पासुन त्यांच्या जीवाला एक ना एक दिवस धोका उद्भवला असता परंतू दैव बलवत्तर अशी घटना होण्यापूर्वीच हे पिल्लू नजरेस आले आणि त्याची वार्ता गावभर पसरताच रोहा सह्याद्री वन्यजीव सामजिक संस्थेच्या सदस्यांनी मगरीचे पिल्लु पकडुन वन विभागाच्या ताब्यात दिले असल्याने या संस्थेच्या पथकाचे रोहा पोलिस निरिक्षक देविदास मुपडे यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच वरसे सह रोहा तालुक्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे...

Post a Comment

Previous Post Next Post