केळवणे पनवेल -:२७ मे /अजय शिवकर/
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या परीक्षेत को. ए.सो. हायस्कूल , केळवणे शाळेचा निकाल १००% लावून यशाची परंपरा कायम राखली आहे... शाळेतून एकूण ७६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी सर्व विद्यार्थी पास होउन १६ विद्यार्थ्यांना विशेष
प्राविण्य तर ४८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले...
कु अक्षरा प्रल्हाद मोकल हिने ९३.४०% मार्क मिळवून शाळेत प्रथम आली. (गुण-४६७)
कु. राणी नरेश म्हात्रे हीने ९०.४०% मिळवून शाळेत व्दितीय आली. (गुण-४५२)
कु. तन्वी जनार्दन पाटील हिने ८६.००% गुण मिळवून शाळेत तृतीय आली (गुण-४३०)
को.ए. सो. हायस्कूल केळवणेच्या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक श्री.भीमराज डोळे सर, शाळा समिती अध्यक्ष मा. श्री. वि.ना.कोळी,सदस्य श्री. प्रकाश शिवकर, श्री. डाँ. देवीदास शिवकर, श्री. आशीष घरत, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, सदस्य मातापालक संघ, विदयार्थी व पालकवर्ग या सर्वांचे मोलाचे योगदान आहे...