महाराष्ट्र वेदभुमी

रोहातील पीजी देशपांडे कोचिंग क्लासने आपली यशाची परंपरा कायम ठेवली


रोहे :- विशेष प्रतिनिधी

दहावीत तब्बल १२ विद्यार्थ्याना ९० टक्यापेक्ष जास्त गुण

रोहा शहरात कोचिंग क्लासेस अग्रेसर असलेल्या पीजी देशपांडे कोचिंग क्लासने आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली असून नुकत्याच झालेल्या सीबीएसई दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले आहे. यावर्षी या कोचिंग क्लास मध्ये १२ विद्यार्थ्यांना ९० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. या क्लास मधील यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे...

यावर्षी पीजी देशपांडे कोचिंग क्लासेस मध्ये ९८.२० मिळून निरज महादेव सरसंबे प्रथम, ९६.८० टक्के गुण मिळवून सिया संदीप सरफळे द्वितीय, शार्वी विनायक आरेकर ९५ टक्के गुण मिळवून तृतीय, अनुष्का सतिष पवार ९४.८ टक्के गुण मिळवून चतुर्थ व  मानसी रमण कापसे  ९४.४ टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकावला आहे. या विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लासचे प्रमुख पुरुषोत्तम देशपांडे, शिक्षक दर्शना चावरेकर, ओंकार खोंडे, अनिल घरजाळे यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post