महाराष्ट्र वेदभुमी

कोमसापच्या मधुबन कट्ट्याचे १०३वे कविसंमेलन काव्या सोबत भजनात न्हाऊन निघाले


उरण/ २० मे /  अजय शिवकर/

उरण मधुबनकट्टा कोमसापने.     " पर्यावरण आणि उन्हाच्या झळा"

या विषयांवर नेहमीप्रमाणे १७ तारखेला कविसंमेलन घेऊन श्रोत्यांना बहारदार अशा मनाला गारवा देणा-या कविता सादर करून कट्टा बहरविला ".  उन्हाच्या झळातही मधुबन कट्टा बहरत आहे..


असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रायगड भूषण प्रा. एल बी. पाटील यांनी मांडले.अध्यक्षस्थानी कवी नरेश पाटील होते .सूत्रसंचालन रंजना केणी यांनी अतिशय सुरेख केले...


  कविसंमेलनात अनुज शिवकर, मच्छिंद्र म्हात्रे,राम म्हात्रे, अनिल भोईर, संग्राम तोगरे, अजय शिवकर,नरेश पाटील, भगवान म्हात्रे,अरुण म्हात्रे, किशोर म्हात्रे इत्यादींनी कविता सादर केल्या..

या कार्यक्रमात सहभाग घेऊन उरण येथील कित्येक ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवरांनी आनंद मिळवला...



      खरं वातावरण फुलविले  भजन गायक अशोकबुवा पाटील, डि.आर.ठाकूर , आणि सहकारी यांच्या सुश्राव्य भजनाने... 

   कार्यक्रमाच्या उत्तर भागात  रायगड भूषण नितेश पंडित (मोठी जुई)यांना निवेदन सेवेबद्दल, डॉ.रवींद्र गावंड *वशेणी) , मान.श्री अशोक पाटील (जांभूळपाडा). यांना  भजन सेवेबद्दल कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरण यांच्या कडून कडून जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.. 

  या वेळेस  साहित्यिकांच्या कट्ट्यावर जीवन गौरव पुरस्कार मिळणे हे आम्हा मंडळीचे भाग्य आहे असे मत रायगड भूषण श्री.नितेश पंडीत यांनी व्यक्त केले...

    कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन म.का.म्हात्रे यांनी उत्तमरीत्या केले...या वेळेस मधुबन कट्ट्यावर 60 हून अधिक जेष्ठ नागरिक होते...

        

.

Post a Comment

Previous Post Next Post