महाराष्ट्र वेदभुमी

चिल्हे कब्बडी स्पर्धेत अंतीम विजेता धाक्सूद चिल्हे संघ तर उपविजेता ठरला वरसगाव संघ.



कोलाड (श्याम लोखंडे) 

रोहा तालुक्यातील खांब विभागातील धाक्सूद क्रिडा मंडळ चिल्हे यांच्या वतीने तसेच कोलाड कब्बडी असो.यांच्या मान्यतेने मौजे चिल्हे येथे विभागीय कबड्डी खेळाचे आयोजन करण्यात आले होते.तर सदरच्या सामन्यात अंतिम फेरीचा सामना हा चिल्हे विरुद्ध वरसगाव यांच्या रंगला मात्र धाक्सूद चिल्हे संघानी वरसगाव संघाचा पराभव करत अंतीम विजेतेपद पटकावले तर वरसगाव संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

स्पर्धेचे शुभारंभ ग्राम पंचायतीचे सरपंच रविंद्र मरवडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी प्रमोद लोखंडे ,अनिल महाडिक ,संदीप महाडिक, उमेश लोखंडे,ठमाजी महाडिक,विनायक महाडिक राम महाडिक,विलास शिंदे ,विनायक शिंदे,तुकाराम कोंडे , रविंद्र लोखंडे, डॉ.श्यामभाऊ लोखंडे, मारूती खांडेकर सर ,असो.माजी अध्यक्ष महेश ठाकुर, अध्यक्ष सानप, मंगेश लोखंडे ,अशोक खांडेकर, मधुकर कोठेकर, नारायण महाडिक प्रभाकर शिंदे, सुनील महाडिक, अनंत महाडिक संतोष महाडिक,वासुदेव महाडिक आदी कब्बडी खेळाडू तसेच रसिक प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते...


अती उत्साही वातावरणात संपन्न झालेल्या अखेरच्या  स्पर्धेतील अंतीम फेरीतील सामना हा धाक्सूद चिल्हे विरुद्ध स्वयंभु वरसगाव यांच्यात मोठी चुरशीची व अटीतटीची लढत रसिक प्रेक्षक यांना पाहवयास मिळाली अखेर धाक्सूद चिल्हे बाजी मारत वरसगाव संघाला पराजीत करून अंतीम विजेतेपद पटकावले तर वरसगाव संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले तसेच संघातील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला गांवदेवी बाहे,तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला तो उम्बर्डी संघ तसेच स्पर्धेतील मलिकावीर ठरला सनी कोठेकर धाक्सूद चिल्हे संघ उत्कृष्ठ चढ़ाई बहाद्दर राज आंब्रुसकर वरसगाव तर उत्कृष्ठ पक्कड़ हरिश हलदे धाक्सूद चिल्हे हा खेळाडू ठरला आहे...

यावेळी विजेत्या संघाला रोख पारितोषिक आणि चषक देऊन त्यांचे सन्मान करण्यात आले तसेच स्पर्धेतील मालिकावीर आणि उत्कृष्ठ खेळाडूंना देखील उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक तसेच सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी धाक्सूद चिल्हे च्या सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले...

Post a Comment

Previous Post Next Post