उरण १० एप्रिल (अजय शिवकर)
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी उरण कोळीवाडा येथे रा. स्व. संघ जनकल्याण समिती वामनराव ओक (ठाणे ) रक्तपेढी आणि उरण कोळीवाडा ग्रामस्थ यांच्या विद्यमाने २४ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले...या रक्तदान शिबिराला नगरसेवक, विविध कार्यकर्ते तसेच उरण शहरातील कित्येक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला...
यावेळी उरण कोळीवाड्याचे अध्यक्ष प्रीतम देवचंद कोळी जातीने उपस्थित होते..
यावेळी गुढीपाडव्याचा सण असला तरी 28 रक्तदात्यांनी रक्तदान केले ,परंतु पुढच्या वर्षी याही पेक्षा जास्त रक्तदाते वाढवू असा विश्वास अध्यक्ष संदीप कोळी यांनी दिला...

