शहानवाज मुकादम/रोहा
दि:27 एप्रिल 2024
नसीम खान कॉंग्रेसचे कट्टर समर्थक आसुन एमआयएम ची ऑफर नाकारली...
मुंबई: लोकसभा निवडणुकीपूर्वी मिलिंद देवरा,बाबा सिद्दीकी,संजय निरुपम आणि अशोक चव्हाण या तीन बड्या नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली होती, यापैकी देवरा,सिद्दीक आणि संजय निरुपम यांची पक्षातील एक्झिट मुंबई काँग्रेस साठी चिंताजनक मानली जात असतानाच या धक्क्यातून संघटना सावरत नाही,त्यातच कॉंग्रेसने मुंबईतून वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर कॉंग्रेसमधील अंतर्गत नाराजी उसळली...
कॉंग्रेसने महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार दिला नसल्याने मुंबई चे कॉंग्रेस नेते नसीम खान यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कॉंग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामाच दिला...
"काँग्रेस आणि महाविकास आघाडीला अल्पसंख्यांकांची मते हवी, पण अल्पसंख्यांक उमेदवार नको"
नसीम खान यांनी काँग्रेसला लाथ मारावी... आमच्या पक्षात येऊन त्यांच्या पसंतीचा मतदार संघ निवडावा आणि लोकसभेला उभे राहावे आणि त्यांच्या उमेदवारीसाठी मोठी यंत्रणा उभी करून प्रचार करू, अशी ऑफर ओवैसी यांनी नसीम खान यांना दिली...मात्र नसीम खान हे कॉंग्रेसचे कट्टर समर्थक असल्याने ही ऑफर नाकारली...
काँग्रेस हायकमांडवर त्यांची नाराजी नसुन काँग्रेस आणि महाविकास आघाडीला अल्पसंख्यांकांची मते हवी आहेत, पण अल्पसंख्यांक उमेदवार नको आहे, एवढेच त्यांचे म्हणणे आहे...राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी हेच नेते आहेत..त लवकरच त्यांची भेट घेऊन तक्रारी त्यांच्या कानावर घालणार आहे, असे नसीम खान यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले...