महाराष्ट्र वेदभुमी

गोरेगांव शहरातील भाविक पाहिले श्रीराम नवमी उत्सव साजरे करण्यास सज्ज


गोरेगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर 

दुग्धशर्करा योग म्हणजे बजरंग दल रायगड जिल्हा संयोजक आदित्य गोरेगांवकर यांचे वाढदिवस एकाच दिवशी

 ५०० वर्षांच्या संघर्षानंतर प्रभू श्रीराम अयोध्येतील भव्य दिव्य मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी विराजमान झाले... श्रीराम प्राणप्रतिष्ठापना होऊन अवघ्या ३ महिन्यांतच श्रीराम नवमी आल्याने, हा उत्सव देशभरात भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी बजरंग दल आणि इतर हिंदू संघटना सज्ज झाले आहेत. प्राणप्रतिष्ठेनंतर प्रथमच होणार असलेले श्रीराम नवमी उत्सवासाठी संपूर्ण देश आतूर असल्याचे दिसून येत आहे. देशभरात मंदिरांनी आधीच कार्यक्रम सुरू केले आहेत जे १७ एप्रिल रोजी रामनवमीपर्यंत सुरू राहतील, चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस देखील आहे, जो ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्यापासून सुरू झाला आहे. अनेक देवस्थानांनी १० दिवसांचे कार्यक्रम सुरू केले आहेत...

८४ खेडेगावांचा केंद्रबिंदू असणारे गोरेगांव शहर, दि. १७ एप्रिल २०२४ रोजी होत असलेले शहरातील पाहिले श्रीराम नवमी उत्सवाचे अभूतपूर्व अनुभव घेण्यासाठी सज्ज झाले आहे. श्रीराम नवमी उत्सव समिती आणि बजरंग दल गोरेगांव लोणेरे विभाग जय्यत तयारीला लागले असून सर्व हिंदूंना उत्सवात सामील होण्याचे आवाहन करताना पाहायला मिळत आहे. यामध्ये रामनवमीच्या दिवशी शोभा यात्रे मध्ये 'श्रीराम रथोस्तव' या रथोत्सवाचा, वारकरी संप्रदायाचे भजन पथक, खालू बाजा लेझीम पथक आणि पुणेरी झांज पथक यांचे समावेश असणार आहे. चैत्र शुद्ध नवमी अर्थातच विष्णु भगवंतांचे सातवे अवतार मानले जाणारे प्रभू श्रीराम यांच्या जन्मदिवशीच दुग्धशर्करा योगाने आपलाही वाढदिवस त्याच दिवशी आल्याने बजरंग दल रायगड जिल्हा संयोजक आदित्य रमेश गोरेगांवकरांचे मन हर्षो-उल्हासाने भरून गेले आहे. हे केवळ योगा-योग नाही. 'सर्वस्यापि भवेद्धेतुः' अर्थात, कोणतीही गोष्ट यादृच्छिक नसण्यामागे एक वैश्विक कारण आहे. हे अधर्मियांना आणि विरोधकांना ईश्वराने दिलेले संकेत आहे असे बजरंग दल रायगड जिल्हा संयोजक आदित्य रमेश गोरेगांवकर यांनी सांगितले...

Post a Comment

Previous Post Next Post