पुगांव रोहा - (नंदकुमार कळमकर )
आदिवासी बांधवांनी पारंपारिक नृत्य केले सादर,
गरीब व कष्टकरी समाजासाठी निमेश वाघमारे यांचे काम कौतुकास्पद:-सुरेश मगर
निमेश वाघमारे संस्थापक असलेल्या आधार फाउंडेशनच्यावतीने रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधवांचा भव्य मेळावा सुकेळी (नागोठणे) येथे घेण्यात आला. या कार्यक्रमास रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता...
या मेळाव्यानिमित्ताने आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. त्या नृत्य स्पर्धेत आदिवासी बांधवांकडून आदिवासी समाजातील पारंपारिक नृत्य सादर करण्यात आले. यावेळी लहान मुलांसह तरुणांनी विविध पारंपारिक नृत्य सादर केले.व आपल्या अंगीभुत असलेली कला सादर केले.या आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमास ओबीसी जनमोर्चा रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश मगर, उपतालुकाप्रमुख मनोज खांडेकर, आधार फाउंडेशनचे अध्यक्ष निमेश वाघमारे,पुढारीचे उपसंपादक महादेव सरसंबे,ओबीसी जनमोर्चा रोहा तालुका अध्यक्ष अनंत थिटे,निडी तर्फे अष्टमी उपसरपंच उत्तम नाईक,माजी सरपंच एकनाथ ठाकूर,माजी सदस्य यशवंत हळदे,ग्रामपंचायत सदस्य प्रकाश डोबळे,सचिन भोसले,नारायण मोहिते,तालुका चिटणीस मंदार कोतवाल, माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेश शिरसे,संजय कनघरे, आदिवासी विकास प्रकल्प निरीक्षक सूर्यवंशी,सुषमा वाघमारे, कलाकार नितेश बुंदे,नैनिता काकरा आदि उपस्थित होते...
यावेळी सुरेश मगर यांनी आधार फाउंडेशनच्यावतीने विविध उपक्रम राबवत असताना गोरगरीब आदिवासी समाजासाठी आधार फाउंडेशनच्यावतीने निमेश वाघमारे यांनी केलेले काम कौतुकास्पद असल्याचे सांगितले..
आपल्या प्रास्ताविकात निमेश वाघमारे यांनी आधार फाउंडेशन च्या वतीने आदिवासी समाजासाठी विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आतापर्यंत काम केले आहे. कोरोना महामारी काळात आपण समाजासाठी चांगले काम केले आहे. त्यांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे निमेश वाघमारे यांनी शेवटी सांगितले.या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार आधार फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले.या कार्यक्रमास आदिवासी समाज बांधवांचा मोठा जन समुदाय उपस्थित होता..

