महाराष्ट्र वेदभुमी

खांब पंचक्रोशीत बहरला वैष्णवांचा मेळा,अखंड हरिनाम सप्ताहात अवतरले शंभू महादेव.



कोलाड (श्याम लोखंडे) 

धार्मिक आणि आध्यात्मिक वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या रोहा तालुक्यातील नामवंत अशा श्रीसंत सेवा मंडळ खांब पंचक्रोशीचा ६७ वे  अखंड हरिनाम सप्ताह नडवली येथे ३० मार्च ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत अनेक साधू संत यांच्या प्रबोधन कीर्तनरूपी सेवेच्या माध्यमातून संपन्न होत असून या प्रसंगी येथील नडवली युवक मंडळांनी विविध प्रकारच्या कलाकृती निर्माण करत हा उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून सोमवारी तिसऱ्या दिवशीची कीर्तन रुपी सेवा हभप रामदास महाराज टोंगले गुरुजी यांची संपन्न झाली यावेळी येथील युवकांनी चक्क आकर्षक म्हणून हुबेहूब शंभू महादेव याचे रूप धारण करून उपस्थीत भाविकांना दर्शन दिले...


कोकण वाशीयांचे श्रद्धास्थान परमपूज्य स्वानंद सुखनिवासी सद्गुरू वै हभप अलिबागकर महाराज,गुरुवर्य गोपाल महाराज वाजे,धोंडूबाबा कोल्हटकर यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या तसेच परमपूज्य पांडुरंग शात्री आठवले (दादा) आणि सद्गुरू मामासाहेब दांडेकर गुरुवर्य बाबामहाराज सातारकर यांचे थोर प्रबोधन लाभलेल्या खांब पंचक्रोशीत हभप नारायण दादा वाजे हभप दत्तू महाराज कोल्हटकर (पंढरपूर) यांच्या कुशल मार्गदर्शन तसेच हभप रायगड भूषण मारुती महाराज कोल्हटकर यांच्या नेतृत्वाने हा अखंड हरिनाम व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण श्री क्षेत्र नडवली या ठिकाणी मोठ्या उत्साह वातावरणात संपन्न होत असून याची जय्यत तयारी नडवली ग्रामस्थ युवक मंडळ महिला वर्ग तसेच मुंबईकर मंडळी व आदिवासी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आली आहे...

इवलेसे रोप लावियेले द्वारी त्याचा वेणू गेला गागणापरी वै.स्वा. सु. नि. गुरुवर्य अलिबागकर महाराज, गुरूवर्य गोपाळ बाबा वाजे, गुरुवर्य धोंडू महाराज कोल्हटकर यांनी या पंचक्रोशीत सदुसस्ट वर्षापूर्वी वारकरी संप्रदायाचे हे बीज लावले त्याचे रोपट आज वृक्षात रूपांतर होऊन पहावयास मिळत असुन आजची पिढी धार्मिक आणि आध्यात्मिक विचारांचा वारसा पुढे अविरतपणे खांब पंचक्रोशीचे वैभव रायगड भूषण हभप मारुती महाराज कोल्हटकर यांच्या नेतृत्वाखाली चालवत असताना या प्रसंगी दिसत आहे...

सदरच्या आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात जय जय राम कृष्ण हरी मंत्र जप श्री संत ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण , श्री संत तुकाराम महाराज यांच्या गाथेवरील भजन , संपुर्ण हरिपाठ तसेच महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांचे प्रवचन तसेच कीर्तन रूपी सेवा या प्रसंगी संपन्न होत असून येथील युवकांनी या प्रसंगी केलेली सजावट तसेच भव्य दिव्य उभारण्यात आलेले शिवस्मारक त्याच प्रमाणे दररोज विविध देव देवतांच्या रूपातून वेशभूषा परिधान करून किर्तनकार महाराज यांच्या कीर्तनरुपी सेवेत सजवतीतून प्रकट करीत आहेत त्यामुळे सुरू आसलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहात अधिक भाविकांना आनंद मिळत असुन याचा आनंद लुटत आहेत तसेच हा कार्यक्रम अधिक यशस्वी करण्यासाठी नडवली ग्रामस्थ,युवक व महीला मंडळ तसेच श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशी अधिक परिश्रम घेत आहेत...



Post a Comment

Previous Post Next Post