कोलाड (श्याम लोखंडे)
कोकण स्वराज्य संस्था विधान परिषदेचे आमदार युवा नेते अनिकेत भाई तटकरे यांनी खांब पंचक्रोशीतील अखंड हरिनाम सप्ताहात सदिच्छा भेट देत येथील वारकरी संप्रदाय मंडळी तसेच नडवली ग्रामस्थ यांना या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थीत दर्शवित शुभेच्छा दिल्या...
कोकण वाशीयांचे श्रद्धास्थान परमपूज्य स्वानंद सुखनिवासी सद्गुरू वै हभप अलिबागकर महाराज,गुरुवर्य गोपाल महाराज वाजे,धोंडूबाबा कोल्हटकर यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या तसेच परमपूज्य पांडुरंग शात्री आठवले (दादा) आणि सद्गुरू मामासाहेब दांडेकर गुरुवर्य बाबामहाराज सातारकर यांचे थोर प्रबोधन लाभलेल्या खांब पंचक्रोशीत हभप नारायण दादा वाजे हभप दत्तू महाराज कोल्हटकर (पंढरपूर) यांच्या कुशल मार्गदर्शन तसेच हभप रायगड भूषण मारुती महाराज कोल्हटकर यांच्या नेतृत्वाने हा अखंड हरिनाम व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण श्री क्षेत्र नडवली या ठिकाणी मोठ्या उत्साह वातावरणात संपन्न होत असून याची जय्यत तयारी नडवली ग्रामस्थ युवक मंडळ महिला वर्ग तसेच मुंबईकर मंडळी व आदिवासी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आली होती..
कोकणात तसेच रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील वारकरी संप्रदायाची वैभवशाली परंपरा लाभलेल्या खांब पंचक्रोशीचा ३० मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशीचा ६७ वा.अखंड हरिनाम सप्ताह परंपरेनुसार यजमान श्री क्षेत्र नडवली येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून या प्रसंगी आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या यावेळी सदर ग्रामस्थ आणि महीला मंडळ तसेच खांब पंचक्रोशी यांच्या वतीने त्यांचे मनःपुर्वक स्वागत केले...

